सिद्धार्थनगर शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार शुद्ध पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:21 IST2021-03-26T04:21:20+5:302021-03-26T04:21:20+5:30
श्रीगोंदा : शहरातील सिद्धार्थनगरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला रयत सेवक माजी प्राचार्य श्रीरंग अंबादास लोखंडे यांचे पुत्र बाळासाहेब ...

सिद्धार्थनगर शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार शुद्ध पाणी
श्रीगोंदा : शहरातील सिद्धार्थनगरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला रयत सेवक माजी प्राचार्य श्रीरंग अंबादास लोखंडे यांचे पुत्र बाळासाहेब व कन्या सुनीता यांनी विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा वॉटर प्युरिफायर भेट दिला आहे. त्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आहे.
रयत शिक्षण संस्थेतील मुख्याध्यापक श्रीरंग लोखंडे यांचा स्मृतिदिन सिद्धार्थनगर शाळेत पार पडला. ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस म्हणाले, शाळेस भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊ.
यावेळी सुमनबाई लोखंडे, बाळासाहेब लोखंडे, अभिमान सोनवणे, राजू गोरे, अख्तार शेख, अशोक खेंडके, बापू गोरे, प्रशांत गोरे, संतोष क्षीरसागर, संतोष कोथिंबिरे, संग्राम घोडके, शहाजी खेतमाळीस, प्रा. बाळासाहेब बळे, बाजीराव कोरडे, हृदय घोडके, नंदू ससाणे, आदी उपस्थित होते.
मुख्याध्यापक संदीप मोटे यांनी प्रास्ताविक केले. शिक्षिका शारदा शेळके यांनी सूत्रसंचालन केले. मंगल मोटे यांनी आभार मानले.