विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:24 IST2021-08-27T04:24:57+5:302021-08-27T04:24:57+5:30

राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करिअर कट्टा या उपक्रमाची विद्यार्थ्यांना ...

Students should shape their careers | विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवावे

विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवावे

राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करिअर कट्टा या उपक्रमाची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या उद्देशाने आयोजित जागर करिअर कट्ट्याचा या जिल्हास्तरीय वेबिनारमध्ये ते बोलत होते.

शितोळे म्हणाले, महाविद्यालयीन युवक ज्यांना स्वतःचा उद्योगव्यवसाय सुरू करावयाचा आहे, त्यांचे उद्योजकीय कौशल्य वाढीस लागण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चालू असणाऱ्या वेगवेगळ्या संकल्पनांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, या दृष्टिकोनातून उद्योजक आपल्या भेटीला हा उपक्रमही राबविला जात आहे. या सर्व उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभागी व्हावे व त्याचा फायदा घेऊन आपले करिअर घडवावे, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

अगस्ती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर शेळके, शेवगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे तसेच जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा समन्वयक प्रा. संदेश कासार यांनी प्रास्ताविक केले. प्रा. राजीव काशीद यांनी आभार मानले.

Web Title: Students should shape their careers