शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
2
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
3
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
4
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
5
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
6
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
7
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
8
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
9
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
10
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
11
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
12
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
13
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
14
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
15
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
16
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
17
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
18
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
19
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
20
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीसाठी विद्यार्थ्यांचा ओढा ग्रामीण भागाकडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : दीड वर्षापासून कोरोना महामारीने थैमान घातले आहे. सर्व क्षेत्र या महामारीच्या सावटाखाली आहे. उद्योग, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : दीड वर्षापासून कोरोना महामारीने थैमान घातले आहे. सर्व क्षेत्र या महामारीच्या सावटाखाली आहे. उद्योग, व्यवसाय, व्यापार, रोजगार यांच्यासह सर्वच प्रकारच्या शिक्षण व्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे गेल्या वर्षापासून ऑफलाइन शिक्षणाचे धडे बंद झाले आहे. त्यातच शहरात राहण्यासाठी अथवा प्रवास करण्यासाठी कोणत्याच प्रकारची सार्वजनिक वाहतूक पाहिजे त्या प्रमाणात सुरू नाही. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांचा अकरावीचे शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागाकडे ओढा असल्याचे दिसू लागले आहे.

कोरोनामुळे दीड वर्षांपासून सततचा लॉकडाऊन आहे. त्यामुळे शहरात राहण्याची, जेवणाची व प्रवासाची मोठी गैरसोय होते आहे. मोठ्या शहरात शिक्षण घेण्याची इच्छा असली तरी सद्य:स्थिती तशी नाही. कारण गेल्यावर्षी शहरात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्यांचे अनुभव पाहता यंदा दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याची होणारी गैरसोय टाळण्यासाठी ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्याची विद्यार्थ्यासह पालकांची मानसिकता झाली आहे.

.............

जिल्ह्यात अकरावी प्रवेश देणारी कनिष्ठ महाविद्यालये - ४४०

एकूण जागा - ७६,६००

यंदा दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी - ७०,५६६

अनुदानित तुकड्या - ४५३

विनाअनुदानित तुकड्या - २९५

स्वयंअर्थसहाय तुकड्या - १९२

..............

यंदा माझा दहावीत प्रथम क्रमांक आला आहे. अकरावीत प्रवेशासाठी सीईटी परीक्षा ठेवण्यात आली आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर माझी मोठ्या शहरातील महाविद्यालयात प्रवेश न घेता कोपरगाव येथे प्रवेश घेण्याची इच्छा आहे.

- श्रुती वरकड, विद्यार्थिनी

...........

दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालो आहे. कोरोनाची परिस्थिती असल्याने आमची व पालकांची आमच्या गावातील कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीत प्रवेश घेण्याची तयारी झाली आहे.

- यश गोरे व विशाल गोरे, विद्यार्थी

..............