शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षणात मन रमेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:24 IST

देवदैठण : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सलग दुसऱ्या शैक्षणिक वर्षात शाळा, महाविद्यालये बंद असून ती सुरू होऊ शकली नाहीत. ...

देवदैठण : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सलग दुसऱ्या शैक्षणिक वर्षात शाळा, महाविद्यालये बंद असून ती सुरू होऊ शकली नाहीत. शाळा प्रत्यक्ष बंद आहेत, पण शिक्षण मात्र ऑनलाईन पद्धतीने सुरू ठेवण्याची कसरत चालू असून शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनातही अडचणी येत आहेत. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणात अनेक अडथळे येत असल्याने शालेय विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षणात मात्र मन रमेनासे झाले आहे.

बऱ्याच वेळा श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण व परिसरामध्ये मोबाईल रेंज गायब असते किंवा कमी मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचे धडे गिरवता येत नाहीत. तसेच अनेक पालक सुरुवातीच्या काळात ऑनलाईन शिक्षणासाठी हौसेने मोबाईल विद्यार्थ्यांच्या हाती देत होते, पण आता पालकदेखील मुलांसाठी मोबाईल उपलब्ध करून देत नाहीत. ज्यांच्याकडे मोबाईल आहेत अशी मुले शिक्षणासाठी कमी व गेमसाठीच जास्त मोबाईलचा उपयोग करत आहेत. त्यामुळे त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

काही पालक मोलमजुरी करणारे आहेत, तर काहींचे हातावर पोट आहे. असे पालक पाल्यांना शिक्षणासाठी मोबाईल घेऊ शकत नाही. असे अनेक अडथळे ऑनलाईन शिक्षणात येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. देवदैठण परिसरातील अनेक गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाहीत. त्यामुळे ते ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहत आहेत. म्हणून प्रत्यक्ष शाळा सुरू होण्याची ते प्रतीक्षा करत आहेत.

गतवर्षीपेक्षा यावर्षी ग्रामीण भागातील विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणात जास्त रस दाखवत नसून आपण शिकवलेले विद्यार्थी कितपत ग्रहण करतात, याचे मूल्यमापन करण्यात शिक्षकांनादेखील अनेक अडचणी येत आहेत. ऑनलाईन परीक्षा घेत असताना विद्यार्थ्यांचे तंतोतंत मूल्यमापन होऊ शकत नसल्याची खंत शिक्षक बोलून दाखवत आहेत.

270821\screenshot_20210827_124137.jpg

संग्रहीत चित्र