शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

एसटीची सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : सामान्यांसाठीहीची लालपरी अर्थात एसटी बसमध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्याने, तसेच प्रथमोपचार पेट्याच गायब असल्याने एसटीची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : सामान्यांसाठीहीची लालपरी अर्थात एसटी बसमध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्याने, तसेच प्रथमोपचार पेट्याच गायब असल्याने एसटीची सुरक्षा चव्हाट्यावर आली आहे. ‘लोकमत’ने तारकपूर बसस्थानकात जाऊन याबाबत ‘रियालिटी चेक’ केली असता ही गंभीर बाब समोर आली.

गेल्या काही दिवसांमध्ये एसटी बसमध्ये आग लागल्याच्या किंवा किंवा कोणीतरी त्या लावल्याच्या काही घटना घडल्या आहेत. त्यात प्रवाशांना इजाही झालेली आहे. अशा स्थितीत सामान्यांसाठी असलेली एसटी बस सुरक्षित असावी यासाठी एसटी महामंडळाने प्रत्येक बसमध्ये अग्निशमन यंत्रणा म्हणजे आग विझविण्यासाठीचा बंब ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही यंत्रणा खरंच बसमध्ये आहे का, याबाबत लोकमत प्रतिनिधीने नगर शहरातील तारकपूर बसस्थानकात जाऊन पाहणी केली असता अनेक बसमध्ये हे बंब नसल्याचे आढळले. याबाबत चालक-वाहकांकडे विचारणा केली असता अनेकांना ही यंत्रणा बसमध्ये आहे की नाही, हेच सांगता आले नाही.

-------------

प्रथमोपचार पेट्याच गायब

काही कारणास्तव प्रवासी जखमी झाले तर त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यासाठी प्रथमोपचार पेटी प्रत्येक बसमध्ये असणे बंधनकारक आहे. परंतु अनेक बसमध्ये या पेट्याच नव्हत्या. काहींमध्ये पेट्या होत्या, परंतु त्यात उपचाराचे साहित्यच नव्हते.

----------

या बसेसमध्ये अग्निशमन यंत्रणाच नाही

पंढरपूर-नाशिक (एमएच १४ बीटी ४२८७)

शिंदखेडा-पुणे (एमएच २० बीएल २६६२)

पुणे-मनमाड (एमएच १४ बीटी ०७००१)

नगर-श्रीरामपूर (एमएच ०७ सी ९१३८)

-----------

वायफाय सुविधा बंद

काही दिवसांपूर्वी प्रवाशांसाठी बसमध्ये वायफाय सुुविधा देण्यात आलेली होती. परंतु सोमवारी पाहणी केलेल्या एकाही बसमध्ये ही सुविधा नव्हती. मागेच ही सुविधा बंद करण्यात आली, असे चालक-वाहकांनी सांगितले.

----------

आयो-जावो घर तुम्हारा

स्थानकात जाताना लोकमत प्रतिनिधीकडे कोणीही सुरक्षारक्षकाने विचारणा केली नाही. त्यामुळे स्थानकात उभ्या असलेल्या बस किंवा तेथील परिसर सुरक्षित आहे का, असाही प्रश्न उभा राहतो. स्थानकात दुचाकी, चारचाकीसह कोणीही सहज प्रवेश करू शकत होता.

----------

प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे

बसमध्ये प्रवासी चढताना त्यांनी मास्क लावले आहे की नाही, याबाबत वाहक हटकताना दिसले नाहीत. त्यामुळे अनेक प्रवासी मास्क न लावताच बसमध्ये चढ-उतार करत होते. काही बसमध्ये तर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी उभे राहून प्रवास करताना आढळले.

--------------

फोटो- २२ एसटी