सोमवारी शिवप्रहार प्रतिष्ठान तसेच अन्य संघटनांच्या वतीने श्रीरामपूर व बेलापूर शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यास व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत आपले व्यवसाय बंद ठेवले. बेलापूर येथेही कडकडीत बंद पाळण्यात आला. १४ वर्षीय मुलगी २३ जुलैला बेपत्ता झाली होती. प्रारंभी बेपत्ता झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मुलीचा शोध घेऊन आरोपीला गजाआड करावे, या मागणीसाठी मुलीच्या कुटुंबीयांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची अनेकदा भेट घेतली. गुन्ह्याचा तपास नगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात यावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
बंदच्या काळात अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
-------------
फोटो ओळी : बंद
श्रीरामपूर शहरातील बंददरम्यान शिवाजी रस्त्यावरील चित्र.
---------