योग दिनानिमित्त २० हजार टपालांवर विशेष शिक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:15 IST2021-06-22T04:15:44+5:302021-06-22T04:15:44+5:30

दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदा देशभरात पोस्टाच्या अनेक कार्यालयांत योग दिनानिमित्त ...

Special stamp on 20,000 posts on the occasion of Yoga Day | योग दिनानिमित्त २० हजार टपालांवर विशेष शिक्का

योग दिनानिमित्त २० हजार टपालांवर विशेष शिक्का

दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदा देशभरात पोस्टाच्या अनेक कार्यालयांत योग दिनानिमित्त योगाचे बोधचिन्ह असलेला शिक्का तयार करून तो योग दिनी पाठवण्यात येणाऱ्या टपालांवर उमटवण्यात आला. नगर प्रधान डाकघरच्या वतीने योगाचा हा विशेष शिक्का तयार करण्यात आला होता. या शिक्क्यावर योगसाधनेचे चित्र, २१ जून २०२१ या दिनांकाचा उल्लेख, हिंदी व इंग्रजी भाषेत आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि अहमदनगर प्रधान डाकघर असा उल्लेख होता. २१ जून रोजी पोस्टाच्या मुख्य कार्यालयातून सुमारे २० हजार टपाल पाठवण्यात आले. त्या सर्व टपालांवर योगचिन्हाचा उल्लेख असलेला हा शिक्का मारण्यात आला. योगाचे महत्त्व व जनजागृतीसाठी पोस्टाकडून हा उपक्रम राबविण्यात आला, अशी माहिती पोस्टाचे वरिष्ठ अधीक्षक जे. टी. भोसले, सहायक अधीक्षक संदीप हदगल, वरिष्ठ पोस्टमास्तर महेश तामटे यांनी दिली.

----------

फोटो - २१पोस्ट

Web Title: Special stamp on 20,000 posts on the occasion of Yoga Day