शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर नगर जिल्ह्यात सोयाबीन क्षेत्र वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:15 IST

उत्तरेतील श्रीरामपूर, राहाता, कोपरगाव, संगमनेर, अकोले, नेवासा तसेच राहुरीच्या काही भागांमध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात यंदा काहीशी वाढ होणार आहे. मागील ...

उत्तरेतील श्रीरामपूर, राहाता, कोपरगाव, संगमनेर, अकोले, नेवासा तसेच राहुरीच्या काही भागांमध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात यंदा काहीशी वाढ होणार आहे. मागील वर्षी सोयाबीनला प्रथमच सात हजार रुपये क्विंटलपर्यंत उच्चांकी भाव मिळाल्याने शेतकरी समाधानी आहेत. त्यामुळे कृषी विभागाने यंदा विशेष मोहीम राबवत शेतकऱ्यांना बाजारातील बियाण्यांऐवजी घरी जतन केलेल्या बियाणाची लागवड करण्याकरिता प्रेरित केले आहे. सुमारे ७० टक्के उगवणक्षमता असलेले बियाणे शेतकऱ्यांना नक्कीच फायदेशीर ठरेल, असा विश्वास विभागाने व्यक्त केला आहे.

श्रीरामपूर उपविभागीय कृषी कार्यालया अंतर्गत येणाऱ्या श्रीरामपूर, राहुरी, नेवासे व शेवगाव तालुक्यात शेतकऱ्यांना २० हजार क्विंटल बियाण्यांची आवश्यकता भासणार आहे. मात्र कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणात तब्बल १२ हजार क्विंटल बियाणे शेतकऱ्यांकडे उपलब्ध असल्याचे समोर आले. त्यामुळे केवळ आठ हजार क्विंटल बियाणे हे कृषी केंद्रांकडून खरेदी करावे लागेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध असेल तर त्यांनी पेरणी करण्यास हरकत नाही. मात्र अन्य शेतकऱ्यांनी किमान शंभर मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे उपविभागीय कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी लोकमतला सांगितले.

------

सोयाबीनचे अंदाजित क्षेत्र

श्रीरामपूर : १२ हजार हेक्टर

कोपरगाव : २१ हजार हेक्टर

संगमनेर : ११ हजार हेक्टर

राहाता : १६ हजार हेक्टर

अकोले : १० हजार हेक्टर

नेवासे : ६ हजार हेक्टर

राहुरी : ४ हजार हेक्टर

शेवगाव : २५० हेक्टर

----

सोयाबीन हे स्वयंपराग सिंचित व सरळ वाणाचे पीक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरचे बियाणे किमान दोन-तीन वर्षे वापरण्यास काहीच हरकत नाही. त्यानंतरच बाजारातून बियाणे खरेदी करावे. पेरणीपूर्वी बियाण्यांवर बुरशीनाशकांचा वापर करावा.

- संजय काचोळे, उपविभागीय कृषी अधिकारी, श्रीरामपूर

-----