शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिणेत रब्बीच्या पेरण्या सुरू

By admin | Updated: August 23, 2014 00:44 IST

अहमदनगर : आॅगस्ट महिन्याचे अखेरचे आठ दिवस शिल्लक राहिले आहेत. जिल्ह्यात बहुतांशी भागात परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे.

अहमदनगर : आॅगस्ट महिन्याचे अखेरचे आठ दिवस शिल्लक राहिले आहेत. जिल्ह्यात बहुतांशी भागात परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे. विशेष करून जिल्ह्याच्या दक्षिण भागातील नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड, शेवगाव आणि पाथर्डीच्या काही भागात रब्बी हंगामाची लगबग सुरू झाली आहे. रब्बी हंगामासाठी पेरण्या सुरू झाल्या असून खरीप वाया गेल्यानंतर शेतकऱ्यांची आशा रब्बीवर आहेत. मघा नक्षत्रात अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली आहे.मुळा आणि भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडणारा धोधो पाऊस आता जवळजवळ मंदावला आहे. दोन्ही धरणातील पाणीसाठा समाधानकारक झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. या धरणाच्या पाण्यावर जिल्ह्यातील बहुतांशी शेती अवलंबून असल्याने सर्वांच्या नजरा धरणाच्या पाणीसाठ्यावर खिळल्या होत्या. उर्वरित जिल्ह्यात पावसाअभावी खरिपासाठी अवघी ५० टक्केपेरणी झाली होती. यातील निम्म्यांहून अधिक पिके करपली होती. मात्र, परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी दिलासा मिळाला आहे. विशेष करून पेरलेल्या कांद्यासाठी हा पाऊस जीवनदायी ठरणार आहे. नगर जिल्हा प्रामुख्याने रब्बी हंगामाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, अलिकडच्या काही वर्षात जिल्ह्यात खरीप हंगामात कांदा, कापूस, सोयाबीन या नगदी पिकांचे प्रमाण वाढले. मात्र, तीन-चार वर्षापासून गेल्या वर्षीचा अपवाद वगळता जिल्ह्यात सुरूवातीच्या दोन महिन्यांत पाऊस पडलेला नाही. यामुळे शेतीचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. भर उन्हाळ्यात टँकरलावून जीवंत ठेवलेल्या फळबागांची आजची स्थिती दयनिय झाली आहे. मात्र परतीच्या पावसाला सुरूवात झाली असल्याने शेतकऱ्यांची रब्बीसाठी आशा पल्लवित झाल्या आहेत. जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी ७ लाख ८८ हजार क्षेत्र प्रस्तावित करण्यात आलेले आहे. यात ज्वारी पिकाचे क्षेत्र सर्वाधिक ५ लाख २७ हजार हेक्टर, सव्वा लाख हेक्टर गहू, १४ हजार २०० हेक्टर मका, एक लाख हेक्टर हरभरा आणि अन्य पिकांचे क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी २ लाख ५१ हजार मेट्रीक टन खतांची मागणी नोंदविली आहे. यात १ लाख मेट्रीक टन युरिया, १५ हजार मेट्रीक टन डीएपी, १० हजार मेट्रीक टन एमओपी, ३० हजार एसएसपी, ९६ हजार मेट्रीक टन संयुक्त खतांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)गोकुळाष्टमी झाल्यानंतर दक्षिण जिल्ह्यातील पाच तालुक्यात ज्वारीची पेरणी सुरू होते. जामखेड तालुक्यात पुढील महिन्यांत ज्वारीची पेरणी होईल. गहू आणि हरभरा पिकासाठी आॅक्टोबर महिन्यात पेरणी होते, विशेष करून या दोन्ही पिकांसाठी थंडीची आवश्यकता असते.गव्हासाठी ४८ हजार क्विंटल, ज्वारीसाठी ५ हजार २०० क्ंिवटल, हरभरा पिकासाठी १५ हजार क्विंटल बियाणांची मागणी नोंदविण्यात आली आहे. यातील ज्वारी बियाणे तातडीने आवश्यक असल्याने सुमारे एक हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विलास नलगे यांनी दिली. ं