शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

जनआरोग्य योजनेबाबतचे रुग्णालयांचे प्रश्न सोडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:22 IST

अहमदनगर : महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेसंदर्भात रुग्णालयांना भेडसावणारे प्रश्‍न तातडीने मार्गी लावले जातील. डॉक्टरांच्या मागणीप्रमाणे योजनेत आवश्यक ते ...

अहमदनगर : महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेसंदर्भात रुग्णालयांना भेडसावणारे प्रश्‍न तातडीने मार्गी लावले जातील. डॉक्टरांच्या मागणीप्रमाणे योजनेत आवश्यक ते बदल केले जातील. तसेच ही योजना खाजगी रूग्णालयाच्या सहकार्याने राज्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे आश्वासन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी डॉक्टरांच्या शिष्टमंडळाला दिले.

हॉस्पिटल वेल्फेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जनआरोग्य योजनेसंदर्भात मुंबई येथे आरोग्यमंत्री व या योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.जे. टी. पोळ, नगर येथील डॉ. बापूसाहेब कांडेकर, डॉ. संजय कदम, डॉ. हिमांशू गुप्ता, डॉ. बळीराम बागल, डॉ. राजेंद्र गोस्वामी, डॉ. चिन्मय एराम, डॉ. राज वैद्य आदी उपस्थित होते.

जनआरोग्य योजना सुरु होऊन अकरा वर्ष झाले, मात्र या योजनेचे पुनरावलोकन झाले नाही. आजारासंबंधी पॅकेजमध्ये कुठलाही बदल झालेला नाही. प्रत्यक्षात उपचारांच्या खर्चामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. रुग्ण व रुग्णालयांच्या तक्रार निवारणासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणे, येत्या पंधरा दिवसात हॉस्पिटल वेल्फेअर असोसिएशनच्या संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांकडून आजाराविषयी पॅकेज दरासंबंधी माहिती मिळवणे, राज्यस्तरावर योजनेचे पुनरावलोकन करणे, ही योजना जास्त प्रभावीपणे राबविण्यासाठी स्टेट हेल्थ इन्शुरन्स सोसायटी, इन्शुरन्स कंपनी आणि हॉस्पिटल वेल्फेअर असोसिएशनचे काही तज्ज्ञ डॉक्टरांची एक समिती स्थापन करणे तसेच कोविड रुग्णालयाला जिल्हाधिकारी यांच्यामार्फत दिलेल्या नोटिसांचा लवकरात लवकर निपटारा करणे, आदी विषय डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने मंत्र्यांसमोर मांडले. येत्या पंधरा दिवसात हॉस्पिटल वेल्फेअर असोसिएशनच्या सदस्यांकडून आलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करून जन आरोग्य योजनेचे पुनरावलोकन केले जाईल, असे आश्वासन यावेळी आरोग्य मंत्री टोपे यांनी शिष्टमंडळाला दिले.

........

जिल्हा रुग्णालयातून मोफत इंजेक्शन देणार

कोरोनाग्रस्त व म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना चांगल्या प्रकारचे उपचार देण्यासाठी तसेच या रुग्णांना लागणारे इंजेक्शन जिल्हा रुग्णालयाकडून मोफत उपलब्ध करून दिले जातील, असे आश्वासन यावेळी योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी शिष्टमंडळाला दिले असल्याचे नोबल हॉस्पिटलचे संचालक डॉ. बापूसाहेब कांडेकर यांनी सांगितले.

.........

ओळी-२६डॉक्टर

हॉस्पिटल वेल्फेअर असोसिएशनच्यावतीने सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मागण्यांचे निवेदन देताना डॉ. जे. टी. पोळ समवेत डॉ. बापूसाहेब कांडेकर, डॉ. संजय कदम, डॉ. हिमांशू गुप्ता आदी.