तिसगाव गटाने जोपासली सामाजिक बांधिलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:21 IST2021-04-25T04:21:04+5:302021-04-25T04:21:04+5:30

तिसगाव : पाथर्डी तालुक्यात रुग्णांची संख्या वाढती आहे. तिसगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्य संध्या आठरे व पंचायत समिती सदस्य ...

Social commitment by the Tisgaon group | तिसगाव गटाने जोपासली सामाजिक बांधिलकी

तिसगाव गटाने जोपासली सामाजिक बांधिलकी

तिसगाव : पाथर्डी तालुक्यात रुग्णांची संख्या वाढती आहे. तिसगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्य संध्या आठरे व पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी यांनी तिसगाव येथील कोविड केअर सेंटरला पन्नास बेड उपलब्ध करून दिले. रुग्णांची सातत्याने विचारपूस करत त्यांना दिलासा दिला. सामाजिक बांधिलकी जोपासली, असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केले. शनिवारी कर्डिले यांनी येथे भेट दिली. या वेळी ते बोलत होते. सेवा संस्था माजी अध्यक्ष बाळासाहेब लवांडे, बंडू पाठक, मधुकर वांढेकर, डॉ. अर्चना लांडे, डॉ. बाबासाहेब होडशीळ, शिक्षक नेते विजय अकोलकर, शिक्षक अनिल कराड, प्रवीण तुपे, मिनिनाथ शिंदे, अण्णासाहेब आंधळे, संतोष पालवे, महेश शेळके, संजय वांढेकर, गुणाजी दगडखैर आदी उपस्थित होते.

Web Title: Social commitment by the Tisgaon group