शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
3
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
4
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
5
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
6
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
7
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
8
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
10
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
11
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
12
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
13
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
14
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
15
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
16
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
17
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
18
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
19
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
20
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

सहा हजार उमेदवारांची परीक्षेला दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:26 IST

अहमदनगर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दुय्यम सेवा अंतर्गत पदांसाठी शनिवारी जिल्ह्यातील ६० केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला सहा ...

अहमदनगर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दुय्यम सेवा अंतर्गत पदांसाठी शनिवारी जिल्ह्यातील ६० केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला सहा हजार उमेदवारांनी दांडी मारली. कोणताही गोंधळ न होता शांततेत परीक्षा झाली. विशेष म्हणजे उमेदवारांना प्रश्नपत्रिका सोबत हॅण्डग्लोज, सॉनिटायझर व मास्क असलेले एक किट देण्यात आले होते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दुय्यम सेवा अराजपत्रित गट ‘ब’ साठी शनिवारी संयुक्त परीक्षा झाली. राज्य कर निरीक्षक (एसटीआय), पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) आणि एएसओ (असिस्टंट सेक्शन ऑफिसर, मंत्रालय) या तीन पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी १९ हजार १४७ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १२ हजार ५४९ उमेदवारांनी शनिवारी परीक्षा दिली. नोंदणी केलेल्या ६ हजार ५९८ जणांनी परीक्षेला दांडी मारली.

परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. परीक्षा सुरळीत आणि कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत पार पडली, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा परीक्षेचे केंद्र प्रमुख संदीप निचित यांनी सांगितले.

सकाळी ११ ते दुपारी १२ अशी एक तासाची परीक्षेची वेळ होती. कोरोना नियमांचे पालन करून बैठक व्यवस्था करण्यात आली होती. परीक्षेला प्रवेश करताना उमदेवारांच्या हातात एक किट देण्यात आले होते. त्यामध्ये सॉनिटायझरची पाऊच, हॅण्ड ग्लोज, एक मास्क देण्यात आला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यावेळी विशेष दक्षता घेण्यात आली होती.

---------

प्रशासन, पोलिसांचा बंदोबस्त

नगर शहर व शहरालगत असलेल्या ग्रामीण भागातील ६० उपकेंद्रावर या परीक्षेची व्यवस्था करण्यात आली होती. परीक्षा केंद्राच्या परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला होता. परीक्षेसाठी १५ समन्वय अधिकारी, ३ भरारी पथके, ६० सहायक, १८७ पर्यवेक्षक, ७९ सहायक, ७९८ समवेक्षक, ६० लिपिक, ६० शिपाई, १९६ पाणी वाटप कर्मचारी, ७८ वाहनधारक, ५३ केअर टेकर, ५३ बेलमन असे १७०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.

-------

फोटो- ०४ एमपीएससी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दुय्यम सेवा पदांसाठी शनिवारी नगर शहरातील शाळा, महाविद्यालयात परीक्षा झाली. परीक्षा देऊन बाहेर पडलेले उमेदवार. (छायाचित्र- साजिद शेख)