शहरं
Join us  
Trending Stories
1
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
2
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
3
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
4
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
5
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
6
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
7
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
9
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
10
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
11
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
12
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
13
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
14
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
15
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
16
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
17
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
18
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
19
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
20
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
Daily Top 2Weekly Top 5

साई दरबारी पाण्याचा ठणठणाट

By admin | Updated: June 16, 2016 23:58 IST

अहमदनगर : शिर्डी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात दहा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे़ त्यामुळे शिर्डी शहराला मुळा धरणातून टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या हालचाली जिल्हाप्रशासनाकडून सुरू आहेत़

अहमदनगर : शिर्डी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात दहा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे़ त्यामुळे शिर्डी शहराला मुळा धरणातून टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या हालचाली जिल्हाप्रशासनाकडून सुरू आहेत़ त्याचबरोबर कोपरगाव व राहाता शहरावरही जलसंकट ओढावले आहे़
शिर्डी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ५८० कोटी लीटरचा तलाव आहे़ या तलावाने तळ गाठला आहे़ येत्या २७ जूनपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा तलावात शिल्लक आहे़ नांदुरमधमेश्वर धरणाच्या पाण्याने तलाव भरला होता़ परंतु, तलावाची पाणीपातळी खालावली़ त्यामुळे सध्या शिर्डी शहराला नऊ दिवसांतून एकदा पाण्याचा पुरवठा करण्यात येतो़ तलावातील पाणी संपल्यानंतर काय? असा प्रश्न नगरपंचायती समोर निर्माण झाला आहे़ नगरपंचायत प्रशासनाने मुळा धरणातून पाणीपुरवठा करण्याची मागणी जिल्हाप्रशासनाकडे केली आहे़ शिर्डीपासून मुळा धरण ७० किलोमीटर अंतरावर आहे़ मुळा धरणातून टँकरने पाणी आणण्याचा पर्याय पुढे आला असून, त्यासाठी ४० टँकरची मागणी जिल्हाप्रशासनाकडे करण्यात आली आहे़ शहराच्या मागणीनुसार पाणीपुरवठा करण्यात येणार असून, त्यासाठी मुळा धरण एकमेव पर्याय असल्याचे सुत्रांनी सांगितले़
जून महिना अर्धा संपला़ मात्र अद्याप पावसाने हजेरी लावली नाही़ त्यामुळे कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येसगाव येथील तलावानेही तळ गाठला आहे़ तलावातील पाणी पातळी खालावल्याने कोपरगाव शहराला सध्या दहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होतो़ पाण्याची बचत व्हावी, यासाठी पाणीपुरवठा घट करण्यात आली आहे़ किती बचत केली तरी हे पाणी येत्या १३ जुलैपर्यंतच पुरेल़ त्यानंतर मात्र कोपरगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट होणार आहे़ ही गरज लक्षात घेऊन नगरपंचायत प्रशासनाने टँकरची मागणी केली आहे़ जिल्हाप्रशासनाने जामखेड येथील टँकर कोपरगावला पाठविले आहेत़ टँकर भरण्यासाठी अधिग्रहीत केलेल्या विहिरीतून टँकरव्दारे कोपरगाव शहराला टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले़ राहाता शहराची यापेक्षा वेगळी स्थिती नाही़ राहाता नगरपालिकेकडून जिल्हाप्रशासनाकडे टँकरची मागणी झाली आहे़ प्रस्ताव टंचाई शाखेला प्राप्त झाला असून, शिर्डी, कोपरगाव आणि राहाता तालुक्यातील टँकरची भर पडणार आहे़
(प्रतिनिधी)