सरपंच डॉ. डोंगरे म्हणाले, स्वत:पेक्षा इतरांच्या कल्याणासाठी जीवन जगलेले छत्रपती शिवाजी महाराज युगपुरुष ठरले. सर्वसमाजाला बरोबर घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापन केले. ज्या वयात महाराजांनी किल्ले, गड जिंकले त्या वयातील आजचे युवक मोबाईलमध्ये गुरफटले आहेत. शिवाजी महाराजांचा आदर्श ठेऊन युवकांनी जीवनात वाटचाल करण्याची गरज आहे. एकहाती सत्ता मिळाल्याने सहा महिन्यांत नवनागपूरचे चित्र बलदणार आहे. नवगापूरच्या मूलभूत समस्यांकडे बारकाईने लक्ष देणार आहे. पाणी किमान तीन दिवसाआड तरी मिळेल याबाबत नियोजनाकडे लक्ष घालणार आहे, असे डोंगरे म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल साळवे यांनी केले. संदीप गायकवाड यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला रहिवासी सुहास अकडकर, रुपेश हिवाळे, योगेश घोलप, मोहन गायकवाड, लोंढे, नवनाथ दागंट, प्रकाश भालेराव, अशोक झुंबड, नंदलाल पाल, सामबिहारी राय, सागर कोरे, गौरव काकडे, कार्तिक भालसिंग, राहुल गवळी, राजू दावभट, समर्थ गरुड, तसेच महिला बहुसंख्येने उपस्थित होते.
साईराजनगर येथे शिवजयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:33 IST
सरपंच डॉ. डोंगरे म्हणाले, स्वत:पेक्षा इतरांच्या कल्याणासाठी जीवन जगलेले छत्रपती शिवाजी महाराज युगपुरुष ठरले. सर्वसमाजाला बरोबर घेऊन त्यांनी स्वराज्य ...
साईराजनगर येथे शिवजयंती साजरी
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}