शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
3
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
4
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
5
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
6
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
7
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
8
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
9
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
10
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
11
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
12
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
13
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
14
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
15
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
16
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
17
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
18
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
19
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
20
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
Daily Top 2Weekly Top 5

सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 21:40 IST

प्रवेशद्वारावरील आकर्षक रांगोळ्यांनी भक्तांचे स्वागत केले. फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजळून निघाला.

शिर्डी - ऐश्वर्य आणि मांगल्याचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीपूजनानिमित्त मंगळवारी रात्री साईनगरी दिवाळीच्या प्रकाशाने आणि भक्तीच्या रंगाने न्हाऊन निघाली. या अभूतपूर्व सोहळ्यात साईबाबांच्या तेजोमय मूर्तीवर तब्बल २ कोटी ५० लाख रुपयांचे रत्नजडित सुवर्णालंकार चढविण्यात आले होते.

संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि त्यांच्या पत्नी वंदना गाडीलकर यांच्या हस्ते मंगळवारी सायंकाळी साई मंदिरात लक्ष्मी पूजन झाले. हिरेजडित मुकुट, लाल मखमली शाल आणि पिवळ्या वस्त्रांमध्ये बाबांचे लोभस रूप अधिकच तेजस्वी दिसत होते. मंदिराचा गाभारा, कळस आणि परिसर लाखो दिव्यांच्या रोषणाईने आणि रंगीबेरंगी फुलांच्या मनमोहक सजावटीने उजळून निघाला होता. सायंकाळी ५ वाजता मुख्य पूजनाला सुरुवात झाली, तेव्हा काही काळासाठी दर्शनरांग थांबवून सारा आसमंत केवळ भक्तिरसात न्हाऊन निघाला.

प्रवेशद्वारावरील आकर्षक रांगोळ्यांनी भक्तांचे स्वागत केले. फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजळून निघाला. दिवाळीचा पारंपरिक फराळाचा नैवेद्य बाबांना अर्पण करण्यात आला. लक्ष्मीपूजनानंतर द्वारकामाई आणि लेंडीबागेचा परिसर भक्तांनी लावलेल्या पणत्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला. या मंगलमय सोहळ्याला उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांच्यासह संस्थानचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ आणि असंख्य साईभक्त उपस्थित होते. सायंकाळी सहा वाजता झालेल्या धूपारतीने या भक्तिमय सोहळ्यात आणखीच चैतन्य भरले.

साईबाबांचे ऐश्वर्य
सुवर्ण -५०० किलोपेक्षा अधिक
चांदी - ७००० किलोपेक्षा अधिक
बँक ठेवी- ३३०० कोटी रुपये

दिवाळीनिमित्त श्री साईबाबांच्या तेजोमय मूर्तीवर तब्बल २ कोटी ५० लाख रुपयांचे रत्नजडित सुवर्णालंकार चढविण्यात आले. मंगळवारी सायंकाळी साई मंदिरात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि त्यांच्या पत्नी वंदना गाडीलकर यांच्या हस्ते लक्ष्मी पूजन झाले. यावेळी संस्थानचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Shirdi Shines: Lakshmi Puja Celebrated, Sai Adorned with Gold

Web Summary : Shirdi celebrated Lakshmi Puja with Sai Baba adorned in ₹2.5 crore worth of gold ornaments. The temple was illuminated with lights and flowers, creating a vibrant, devotional atmosphere. Officials and devotees participated in the festivities.
टॅग्स :shirdiशिर्डीSaibaba Mandirसाईबाबा मंदिर