शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIDMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
3
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
4
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
5
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
6
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
7
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
8
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
9
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
10
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
11
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
12
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
13
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
14
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
15
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
16
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
17
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
18
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
19
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
20
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
Daily Top 2Weekly Top 5

साईमंदिर उघडण्यासाठी शिर्डीकरांनी घातले साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:25 IST

साईमंदिर बंद असल्याने शिर्डीसह पंचक्रोशीच संपूर्ण अर्थकारण ढासळले. जवळपास सगळेच बेरोजगार झाले आहेत. उत्पन्न पूर्ण थांबले. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची ...

साईमंदिर बंद असल्याने शिर्डीसह पंचक्रोशीच संपूर्ण अर्थकारण ढासळले. जवळपास सगळेच बेरोजगार झाले आहेत. उत्पन्न पूर्ण थांबले. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. बँकांच्या जप्तीच्या व वीज महामंडळाच्या वीज तोडणी कारवाया सुरू आहेत. नगरपंचायतचे करांसाठी तगादे आहेत. शिर्डीकर आत्महत्येच्या उंबरठ्यावर आले आहेत. भाविक दर्शनाला आतूर झाले आहेत. मंदिर खुले केले तर भक्तांना आत्मिक समाधान व शिर्डीकरांच्या रोजीरोटीचा मार्ग पुन्हा उघडणार आहे. देशभरातील तिरूपतीसारखी देवालये उघडी असताना महाराष्ट्रातील शिर्डीसारखी देवालये कुलूपबंद आहेत. मंदिर उघडण्यासाठी भाजयुमोसह विविध सामाजिक संघटनांनी मागणी करूनही सरकारने दुर्लक्ष केल्याने आजचे आंदोलन करण्यात आल्याचे आयोजक भाजयुमोचे सचिन तांबे यांनी सांगितले.

यापूर्वी सरकारला निवेदन दिले, आज आंदोलन केले. यानंतर देश आणि विदेशातील भाविकांना बरोबर घेऊन राज्य सरकारला मेल केले जाणार आहेत. याशिवाय राज्यपालांचीही भेट घेण्यात येणार असल्याचे तांबे यांनी सांगितले. या आंदोलनात माजी नगराध्यक्ष कैलास कोते, भाजपाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, उपनगराध्यक्ष सचिन कोते, बाळासाहेब गोंदकर, मंगेश त्रिभुवन, अ‍ॅड. अनिल शेजवळ, सुनील लोंढे, मयूर चोळके, चेतन कोते, आकाश त्रिपाठी, बबलू वर्पे, आकाश वाडेकर, सुनील गांगुर्डे, अमित कुटे, सचिन आरणे यांनी सहभाग घेतला. साईदर्शनासाठी आतुर झालेल्या भक्तांना दर्शनाचा लाभ मिळावा व अर्थकारणाचा रुतलेला शिर्डीसह पंचक्रोशीचा गाडा सुरळीत व्हावा, अशी भूमिका माजी नगराध्यक्ष कैलास कोते, भाजपाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, अ‍ॅड. अनिल शेजवळ यांनी केली.