शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

झेंडू, शेवंती, अष्टर फुलांची कोट्यवधींची उलाढाल

By admin | Updated: October 2, 2014 23:50 IST

पारनेर : कांद्याला कमी भाव, अपुऱ्या पावसाने मूग, वाटाणा ही महत्वाची पिके हातातून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असताना शेवंती, अष्टर व झेंडुला सध्या चांगले भाव आहेत.

पारनेर : कांद्याला कमी भाव, अपुऱ्या पावसाने मूग, वाटाणा ही महत्वाची पिके हातातून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असताना शेवंती, अष्टर व झेंडुला सध्या चांगले भाव आहेत. त्यामुळे पारनेर तालुक्यातील फूलशेतीने त्यांना सावरले आहे. या फूल शेतीतून कोट्यावधींची उलाढाल होत आहे. मात्र प्रतिकूल हवामानामुळे फूल उत्पादनावर परिणाम होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.पावसाळा संपत आला तरी तालुक्यात अजून पुरेसा पाऊस नाही. अनेक तलाव अजुनही कोरडे आहेत. शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न देणारे मूग, वाटाणा पीक यंदा पावसामुळे हातातून गेले.त्यामुळे शेतकऱ्यांचे सुमारे पन्नास ते साठ कोटींचे नुकसान झाले. ही पिके गेल्याने बाजारपेठेत फिरणारे सुमारे पन्नास ते साठ कोटींचे अर्थकारणच ठप्प झाले आहे. त्याचा फटका व्यापारी क्षेत्रालाही सर्वत्रच बसला. (तालुका प्रतिनिधी)फूलशेतीने सावरले : प्रतिकूल हवामानामुळे पिकावर परिणामफूलशेतीचा पर्यायमूग व वाटाणा ही महत्वाची पिके हातातून गेल्यानंतर व कांद्याला कमी भाव मिळाल्यानंतर पारनेर, हंगा, कान्हूरपठार, निघोज, सुपा, म्हसणे, दैठणेगुंजाळ, वाळवणे, बाबुर्डी, रायतळेसह परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांनी सध्या फूल शेतीचा पर्याय निवडला आहे. दसरा, दिवाळीला मोठ्या प्रमाणात फुलांना मागणी असते. याचा अभ्यास करून तालुक्यात सुमारे तीनशे ते चारशे हेक्टरवर फुलशेतीची लागवड झाली आहे. सुप्याजवळील नगर तालुक्यातील चास, कामरगाव, सारोळा कासार येथेही फुलशेतीचे उत्पादन चांगले आहे. नगर-पुणे महामार्गावरील सुपा परिसर हार उत्पादनासाठी राज्यात प्रसिध्द आहे. तेथेच अनेक फूल उत्पादकांना विक्रीसाठी व्यापारपेठ उपलब्ध आहे.अष्टर, शेवंतीने तारलेझेंडुला सध्या चाळीस ते पन्नास रूपये किलो भाव असला तरी शेवंती व अष्टरला किलोमागे दीडशे ते दोनशे रूपये भाव असल्याने फूल उत्पादक शेतकऱ्यांना तारले आहे. मागील वेळी भाव अचानक पडल्याने यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी फुलशेतीकडे दुर्लक्ष केले होते. पाऊसच कमी असल्याने विहिरींमधील पाणी कमी होते म्हणून अनेक भागात फुलशेतीचे उत्पादन कमी झाले. फुलांचा भाव वाढल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले़भाव चांगला, उत्पादन घटलेअष्टर व शेवंतीला सध्या भाव चांगला आहे. परंतु हवामानातील परिणाम व पाणी कमी असल्याने फुलांचे उत्पादन घटले आहे. दसऱ्याला अपेक्षित उत्पादन झाले नाही. मुंबईला दीडशे ते दोनशे रूपये भाव मिळतो.-भाऊसाहेब अंबुले, फूल उत्पादक शेतकरीफूलशेतीे क्षेत्रात घटफुलशेतीतून कोट्यावधींची उलाढाल होत होती. परंतु कमी पावसाचा फटका त्याला बसला असून एक ते दोन हजार हेक्टरवर होणारी फुलशेती यावर्षी फक्त दोनशे ते तीनशे हेक्टरवरच होत आहे.- निलेश जाधव, आत्मा कृषी केंद्र