शरद पवार यांचा वाढदिवस श्रीगोंद्यात आघाडीतर्फे साजरा

By Admin | Updated: December 14, 2015 20:52 IST2015-12-14T20:52:42+5:302015-12-14T20:52:42+5:30

राज्याच्या व देशाच्या जडणघडणीत योगदान देणारे राष्ट्रीय नेते शरद पवार यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विविध शैक्षणिक संकुलात विविध

Sharad Pawar's birthday celebrates in Shrigonda | शरद पवार यांचा वाढदिवस श्रीगोंद्यात आघाडीतर्फे साजरा

शरद पवार यांचा वाढदिवस श्रीगोंद्यात आघाडीतर्फे साजरा

श्रीगोंदा : राज्याच्या व देशाच्या जडणघडणीत योगदान देणारे राष्ट्रीय नेते शरद पवार यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विविध शैक्षणिक संकुलात विविध उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला.
श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालयात नागवडे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष केशव मगर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, मुकुंद सोनटक्के, बाळासाहेब गिरमकर, अँड. रंगनाथ बिबे यांनी शरद पवार यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच महाविद्यालयात रक्तदान शिबीर घेण्यात आले.
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात प्राचार्य ज्ञानेश्‍वर म्हस्के, प्रा. तुकाराम दरेकर आदींच्या उपस्थितीत रक्तदान शिबीर घेण्यात आले. राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालयात रांगोळी, वक्तृत्व व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. सुवर्णा होले यांनी 'महिलांचे आरोग्य' या विषयावर मार्गदर्शन केले.

Web Title: Sharad Pawar's birthday celebrates in Shrigonda