पोलीस दलात केल्या जाणाऱ्या टपालाची देवाण-घेवाण आता ऑनलाईन होत असल्याने कामातील तत्परता वाढली आहे, तसेच या प्रणालीच्या माध्यमातून नवीन, प्रलंबित व प्रक्रियेत असलेल्या कामकाजावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना नियंत्रण ठेवणे सोयीचे झाले आहे. यातून जनतेला तत्काळ सेवा व कामात पारदर्शीपणा आला असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले. ई-टपाल प्रणालीमध्ये जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमधील संबंधित अधिकारी व अंमलदार यांना युझर आयडी दिला आहे. त्यांच्याकडून टपालावर कार्यवाही केली जाते. कुणाकडे किती व किती दिवसांपासून टपाल प्रलंबित आहेत याबाबत तत्काळ अवलोकन करता येते. या नवीन प्रणालीमुळे मनुष्यबळ व वेळेची बचत होत आहे, तसेच नागरिकांना त्यांचा अर्ज गहाळ झाला अथवा मिळाला नाही अशी कारणे आता कुणालाही सांगता येणार नाहीत. येणाऱ्या काळात ही प्रणाली आणखी प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.
------------------------
मुदतीच्या आत निर्गती झालेले प्रकरणे
पासपोर्ट- ५४८६
सशुल्क बंदोबस्त-५२८
चारित्र्य पडताळणी-११५७८
पेट्रोलपंप-०४
सुरक्षा रक्षक एजन्सी-१६
शस्त्र परवाना-१८२
स्फोटक परवाना-०४
वाईन शॉप-परमिट रूम-५८
इतर परवाने-०८