सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, उपनिरीक्षक नितीन खैरनार, हवालदार विजय फटांगरे रात्रीच्या वेळी गस्त घालत होते. सुदाम सखाराम बादड (रा. पाचनई, ता. अकोले) याने चोरीची बॅटरी घेऊन त्याच्या घरात लपवून ठेवलेली आढळली. समीर विठ्ठल भारमल (रा. पाचनई), अजय ऊर्फ लाला विष्णू भांगरे, दिलीप विष्णू भांगरे, मच्छिंद्र बुधा ठोंगीरे, मिलिंद भीमा मडके, अनिल भीमा मडके या सर्व आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्यांनी राजूर व परिसरातून वेळोवेळी चोऱ्या केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून एक आयशर टेम्पोची बॅटरी, एक ट्रॅक्टरची बॅटरी, एक तांब्याचा पाणी गरम करण्याचा बंब़, एक सोलर पॅनलची प्लेट, चोरी करण्याकरिता वापरलेली वाहने, सिल्व्हर रंगाची मारुती व्हॅन असा एकूण २ लाख ५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
राजूर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.