खळबळजनक : तरुण, तरुणीचा विहिरीत सापडला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 16:12 IST2021-01-24T16:11:11+5:302021-01-24T16:12:12+5:30
नगर तालुक्यातील दरेवाडी येथील एका विहिरीत तरुण, तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी पहाटे तरुणीचा तर दुपारी सायंकाळी ४ वाजता याच विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळून आला.

खळबळजनक : तरुण, तरुणीचा विहिरीत सापडला मृतदेह
अहमदनगर : नगर तालुक्यातील दरेवाडी येथील एका विहिरीत तरुण, तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी पहाटे तरुणीचा तर दुपारी सायंकाळी ४ वाजता याच विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळून आला.
प्रेम प्रकरणातूृन ही घटना घडली असावी, असा पोलिसांना संशय आहे. अजय सुरेश बडेकर (वय २३) व मानसी भिमा पाचारे (वय २२) असे मयत झालेल्या तरुण, तरुणीचे नाव आहे. रविवारी पहाटे तरुणीचा मृतदेह विहिरीत पाण्यावर तरंगताना मृतदेह आढळून आला होता. दरम्यान विहिरीच्या काठावर तरुणीसह तरुणीच्या चपला आढळून आल्याने पोलिसांना संशय आला. यानंतर पोलिसांनी विहिरीत गळ टाकून शोध घेतला असता दुपारी तरुणाचाही मृतदेह आढळून आला. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसात गुन्ह्याची नोंद केली आहे.