‘संजीवनी’च्या बारा विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:21 IST2021-07-27T04:21:37+5:302021-07-27T04:21:37+5:30

कोपरगाव : संजीवनी के. बी. पी. पाॅलिटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नातून अलीकडेच सहा कंपन्यांनी ‘संजीवनी’च्या मेकॅॅनिकल, इलेक्ट्रिकल, काॅम्प्युटर ...

Selection of twelve students of 'Sanjeevani' in reputed companies | ‘संजीवनी’च्या बारा विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

‘संजीवनी’च्या बारा विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

कोपरगाव : संजीवनी के. बी. पी. पाॅलिटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नातून अलीकडेच सहा कंपन्यांनी ‘संजीवनी’च्या मेकॅॅनिकल, इलेक्ट्रिकल, काॅम्प्युटर व इलेक्ट्रिाॅनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाच्या १२ विद्यार्थ्यांची ऑनलाइन पद्धतीने मुलाखती घेऊन त्यांच्या अंतिम निकालाच्या अगोदरच नोकऱ्यांसाठी निवड केली आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी दिली.

कोल्हे म्हणाले, चालू शैक्षणिक वर्षात संजीवनी पाॅलिटेक्निकने गरजुू ३०४ विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या देऊन एक नवा आयाम प्रस्थापित केला आहे. उर्वरित विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेण्याचे पसंत केले. अलीकडेच निवड झालेल्या १२ विद्यार्थ्यांपैकी स्नायडर इलेक्ट्रिक कंपनीने संगीता पगारे हिची निवड केली. अर्सेलर मित्तल निपाॅन स्टील कंपनीत मेहराज शेख याची निवड झाली. इन्फोसिसने आदित्य सोनवणे व विशाल रंधे यांची निवड केली. एल अँड टी डीफेन्स या कंपनीने अक्षदा वानखेडकर, महेश उदे, कमलेश काटकर व प्रशांत शेलार यांची निवड केली. केपीआयटी कंपनीने शिवानी देवकर व अनुराग कोतवाल यांची निवड केली, तर फिलिप्स कंपनीत नम्रता कमलाकर कसबे व आदित्य दत्तात्रय सोनवणे यांची निवड केली.

या निवडीबद्दल माजी मंत्री संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमीत कोल्हे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच प्राचार्य ए. आर. मिरीकर व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. आय. के. सय्यद यांचे कौतुक केले.

Web Title: Selection of twelve students of 'Sanjeevani' in reputed companies