शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Top Marathi News LIVE Updates: PM मोदींच्या आवाहनामुळे काळजी वाढली, नेमके कशाचे संकेत?, तर्कवितर्क सुरू
3
सोन्यावर पंतप्रधानांचं वक्तव्य, बाजार उघडताच 'टाटा'चा 'हा' शेअर धडाम; रेखा झुनझुनवालांना १७०० कोटींचा झटका
4
'निवडणूक संपताच संकट आठवलं का?'; पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर अखिलेश यादव यांची टीका
5
'सौरभ' बनून मुलींना जाळ्यात ओढायचा शोएब; मोबाईलमुळे ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतराचा खेळ उघड
6
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
7
खळबळजनक! आई-वडिलांनीच दिली मुलाच्या हत्येसाठी ५,००,००० रुपयांची सुपारी
8
Jewellery Stocks Fall: पंतप्रधानांचं आवाहन आणि टायटन, सेनको, कल्याण यांना बसला फटका; लग्नसराईच्या हंगामात गोल्ड शेअर्स आपटले
9
मनालीची सफर ठरली अखेरची! चंबा-नूरपूर हायवेवर भीषण दुर्घटना; ६ जणांचा मृत्यू, ४ गंभीर
10
Trisha Krishnan: तृषा कृष्णनने लग्न का केलं नाही? बिजनेसमॅनसोबत झालेला साखरपुडा, लग्नही ठरलेलं, पण...
11
शिंदेसेनेच्या संघटनबांधणीसाठी श्रीकांत शिंदे राज्यव्यापी दौरा करणार, दोन महिन्यांत २२ जिल्हे पिंजून काढणार 
12
Rohit Pawar : "भ्रष्टाचार करू नका, आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा
13
‘वाह मोदीजी वाह! अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले आज पेट्रोल, डिझेल वापरू नका म्हणून सांगताहेत’  विजय वडेट्टीवार यांचा टोला
14
थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णन गर्दीत अडकली; अभिनेत्रीच्या संयमाचं होतंय कौतुक
15
Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?
16
कल्याण रेल्वे स्थानक की रेडलाइट एरिया ? मध्यरात्री तीन वाजेपर्यंत बेकायदा धंदे, पोलिसांचे नियंत्रण नाही
17
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
18
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
19
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
20
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

करवसुलीसोबत अनधिकृत नळांचाही शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:27 IST

अहमदनगर : थकीत करवसुली करताना, मालमत्ताधारकांकडे असलेला नळ अधिकृत आहे की अनाधिकृत, याची खात्री करावी. नळ अनधिकृत आढळून आल्यास ...

अहमदनगर : थकीत करवसुली करताना, मालमत्ताधारकांकडे असलेला नळ अधिकृत आहे की अनाधिकृत, याची खात्री करावी. नळ अनधिकृत आढळून आल्यास तो अधिकृत करून घ्यावा, असा स्पष्ट आदेश वसुली लिपिकांना देण्यात आला आहे. त्यामुळे आता करवसुलीसोबतच नळांचीही पाहणी होणार आहे.

शहरातील अनधिकृत नळांची शोध मोहीम हाती घेण्याचे यापूर्वीच ठरले आहे. अनधिकृत नळ अधिकृत करताना, मागील दंड न आकारता चालू पाणीपट्टी भरून घ्यावी. त्यामुळे नागरिकही अनधिकृत नळ अधिकृत करून घेण्यास पुढे येतील. त्यातून महापालिकेचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. त्यानुसार, प्रशासनानेही अनधिकृत नळ अधिकृत करण्यासाठी तीन टप्पे निश्चित केले आहेत. तसे परिपत्रक पाणीपुरवठा विभागाकडून जारी करण्यात आले आहे. महापालिकेच्या थकीत करवसुलीसोबतच अनधिकृत नळांचा शोध घेण्याच्या सूचनाही आयुक्त गोरे यांनी केल्या आहेत. त्यानुसार, सावेडी व बोल्हेगाव भागात वसुली लिपिकांकडून अनधिकृत नळ अधिकृत करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अन्य शहर, केडगाव आणि झेंडीगेट भागातीलही अनधिकृत नळ अधिकृत केले जाणार आहेत. उपायुक्त यशवंत डांगे यांनीही शहर प्रभाग समितीची बैठक घेऊन अनधिकृत नळ अधिकृत करण्याचा आदेश दिला आहे.

....

अनधिकृत नळ अधिकृतसाठी अशी आहे सवलत

अनधिकृत नळ अधिकृत करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने तीन टप्पे केले आहेत. त्यानुसार, दंड आकारला जाणार असून, अनधिकृत नळ अधिकृत करण्यासाठी पुढीलप्रमाणे रक्कम आकारली जाणार आहे.

ऑगस्टअखेर- ४,७००

सप्टेंबर ते आक्टोबरअखेर- ५,२००

नोव्हेंबर ते डिसेंबरअखेर- ५,७००

.....

एक ते दोन हजारांपर्यंत दंड

ऑगस्ट अखेर- १,०००

सप्टेंबर ते आक्टोबर- १,५००

आक्टोबर ते नोव्हेंबर- २,०००

.....

चालू पट्टी भरून नळ अधिकृत

चालू पाणीपट्टी- १,५००

अनामत - १,५००

नळजोडणी शुल्क- ५००

सेवा शुल्क- २००