गाडे यांच्या निधीतून शाळा खोल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:22 IST2021-07-27T04:22:56+5:302021-07-27T04:22:56+5:30
शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता जाधव यांनी मंत्री तनपुरे यांच्याकडे शाळेला एलईडी, वीज कनेक्शन व शाळेच्या जुन्या खोल्यांची दुरुस्ती व्हावी, अशी ...

गाडे यांच्या निधीतून शाळा खोल्या
शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता जाधव यांनी मंत्री तनपुरे यांच्याकडे शाळेला एलईडी, वीज कनेक्शन व शाळेच्या जुन्या खोल्यांची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी केली. तनपुरे यांनी या मागण्या लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी राहुरी पंचायत समिती सभापती बेबीताई सोडनर, उपसभापती प्रदीप पवार, वरवंडीचे सरपंच भाऊसाहेब कोळेकर, उपसरपंच शकुंतला पवार, सदस्य नितीन बरे, सलीम शेख, जगदीश भालेराव, कोंडीराम बाचकर, बंटी अडसुरे, ग्रामस्थ दिगंबर ताकटे, शरद ढगे, ज्ञानदेव बरे, कैलास पवार, बाबासाहेब अडसुरे, गोरक्षनाथ भालेराव, नवनाथ ढगे, श्रीकांत ढगे, जालिंदर अडसुरे, नारायण शिंदे, रमेश निसाळ, ग्रामसेवक मीना जाधव, मंदाकिनी निसळ आदी उपस्थित होते.
.............
शेतकऱ्याने दिली जागा
या शाळेच्या नवीन इमारतीचे काम उपलब्ध जागेत बसत नव्हते. जागा कमी पडली म्हणून वरवंडी येथील प्रगतशील शेतकरी दिगांबर ताकटे यांनी आपल्या शेत जमिनीतून शाळेसाठी जागा उपलब्ध करून दिली. यापूर्वी देखील याच शाळेला दिगांबर ताकटे यांच्या वडिलांनी जागा दिली होती.