पारनेर : तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर, राळेणग सिद्धीचे सरपंचपद खुले (सर्वसाधारण) निघाले असून निघोज, अळकुटी येथील सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे.
बुधवारी सकाळी पारनेर तहसील कार्यालय परिसरात प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे यांच्या उपस्थितीत सरपंच आरक्षण सोडत काढण्यात आली.
ग्रामपंचायतनिहाय आरक्षण असे : अनुसूचित जाती : गुणोरे, घाणेगाव, जातेगाव. अनुसूचित जाती महिला : पाबळ, धोत्रे बुद्रूक, वाघुंडे बुद्रूक, अनुसूचित जमाती- म्हसे खुर्द, कुरुंद, वडगाव दर्या. अनुसूचित जमाती महिला : जामगाव, भोयरे गांगर्डा, वडझिरे. ओबीसी : कडूस, कासरे, वेसदरे, पिपरी पठार, कातळवेढा, तिखोल, हिवरे कोरडा, दैठणे गुंजाळ, मुगशी, रुई छत्रपती, पानोली, रांधे, डिकसळ, वडनेर बुद्रुक, कळस. ओबीसी महिला : हत्तल खिडी, भांडगाव वाळवणे, लोणी मावळा, सांगवी सूर्या, पिंपळगाव रोठा, पाडळी कान्हूर, ढवळपुरी, लोणी हवेली, रांजणगाव मशीद, राळेगण थेरपाळ, पिंपळगाव तुर्क-कान्हूर पठार, नांदूर पठार, नारायणगव्हाण, गोरेगाव.
सर्वसाधारण : चिंचोली, पिंपरी जलसेन, वडगाव आमली, माळकूप, सारोळा आडवाई, हंगा, आपधूप, शहाजापूर, पिंपरी गवळी, पाडळी रांजणगाव, गारखिंडी, जवळा, देवीभोयरे, शिरपूर, पाडळी दर्या, रेनवडी, टाकळी ढोकेश्वर, काकणेवाडी, अक्कलवाडी, कारेगाव, भोद्रे, ढोकी, पळशी, मांडवे खुर्द, म्हसोबा झाप, वडगाव सावताल, वारणवाडी, भाळवणी, बाबुर्डी, यादववाडी, म्हसणे, राळेगणसिद्धी, पिंपळनेर, जाधववाडी, गारगुंडी.
सर्वसाधारण महिला : सिद्धेश्वरवाडी, करंदी, किन्ही, वडुळे, गटेवाडी, सुपा, वाडेगव्हाण, मावळेवाडी, वडनेर हवेली, पळवे खुर्द, पाडळी आळे, अळकुटी, म्हस्केवाडी, शेरी कासरे, निघोज, दरोडी, कोहोकडी, कर्जुले हर्या, सावरगाव, देसवडे, वासुंदे, पोखरी, वनकुटे, पळसपूर, पुणेवाडी, विरोली, वाघुंडे खुर्द, अस्तगाव, रायतळे, पळवे बुद्रूक, पठारवाडी, चोंभूत, खडकवाडी, काळकूप, गांजीभोयरे.