शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
2
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
3
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
4
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
5
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
6
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
7
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
8
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
9
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
10
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
11
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
12
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
13
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
14
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
15
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
16
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
17
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
18
तामिळनाडूत मोठ्ठा 'खेला', ११८ साठी झगडणाऱ्या विजय यांना बहुमत चाचणीत १४४ आमदारांचा पाठिंबा! काय घडलं?
19
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
Daily Top 2Weekly Top 5

संत निळोबारायांचा यात्रोत्सव स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:23 IST

पारनेर : कोरोना पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ‌प्रमुख संतांपैकी असणाऱ्या पिंपळनेर (ता. पारनेर) येथील संत निळोबारायांचा यात्रोत्सव स्थगित करण्यात आला आहे. ...

पारनेर : कोरोना पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ‌प्रमुख संतांपैकी असणाऱ्या पिंपळनेर (ता. पारनेर) येथील संत निळोबारायांचा यात्रोत्सव स्थगित करण्यात आला आहे. केवळ ११ मानाच्या दिंड्यांना प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी दिली. भोसले म्हणाले, संत निळोबाराय समाधी सोहळ्याची महापूजा होईल. १६ मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजता जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचा हस्ते सपत्नीक व तालुक्याचे आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीमध्ये समाधीची महापूजा होईल. दुपारी दोन वाजता पांडुरंग महाराज घुले यांचे काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर समाधी सोहळ्याचा समारोप होईल.

देवस्थानचे‌ कार्याध्यक्ष अशोक सावंत, तहसीलदार ज्योती देवरे यांच्यासह देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी दुपारी बैठक पार पडली. संत निळोबाराय यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त दरवर्षी यात्रेचे आयोजन केले जाते. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा स्थगित करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. बैठकीला विविध संस्थांचे सर्व पदाधिकारी, सेवा मंडळांचे पदाधिकारी, गावातील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते. यात्रा स्थगित केली असली तरी समाधीपूजन तसेच इतर विधिवत कार्यक्रम होणार आहेत. अखंड हरिनाम सप्ताह, निळोबारायांचे अभंग गाथा पारायण, हरिपाठ, काकडा, कीर्तन, ५० ते १०० भाविकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. १४ मार्च रोजी तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन होईल. मानाच्या अकरा दिंड्यांनाच पिंपळनेरमध्ये प्रवेश मिळणार आहे.