बदलत्या हवामानात चंदनशेती उपयुक्त ठरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:20 IST2021-03-26T04:20:24+5:302021-03-26T04:20:24+5:30

अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी येथे चंदनशेती लागवड कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत ...

Sandalwood cultivation will be useful in changing climates | बदलत्या हवामानात चंदनशेती उपयुक्त ठरेल

बदलत्या हवामानात चंदनशेती उपयुक्त ठरेल

अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी येथे चंदनशेती लागवड कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, कृषी अधिकारी राजाराम साबळे, सरपंच पूनम आवारी, उपसरपंच गणेश पापळ उपस्थित होते.

डेरे म्हणाले, सध्या आपल्याला चंदन आयात करावे लागते. आता मात्र महाराष्ट्रात चंदनाची व्यापारी लागवड होऊ लागली आहे. चंदनापासून साबण, सौंदर्य प्रसाधने, अत्तर, पावडर, तेल, क्रीम व औषधे तयार केली जातात. त्यामुळे त्याची मागणी वाढतच जाणार आहे.

प्रवीण गोसावी म्हणाले, धामणगाव आवारी गावातील पाच शेतकर्‍यांनी ३.५ एकर क्षेत्रावर चंदन लागवड करून पर्यायी पीक घेतले आहे. नक्कीच याचा इतर शेतकऱ्यांना फायदा होईल. शासनाच्या औषधी व सुगंधी वनस्पती प्राधिकरणमार्फत चंदन शेतीला लागवडीसाठी अर्थसाहाय्य केले जाते. जिल्ह्यात असे प्रयोग झाले आहेत. आत्मांमार्फत आपण गट स्थापन करून चंदन व्यावसायिक शेतीकडे नक्कीच वाटचाल करू शकतो. सध्या आपण आदिवासी भागात मिरी व फणस तसेच चारोळी लागवडीसाठी जनजागृती करत आहे, अशी माहितीही गोसावी यांनी दिली.

शिवाजी आवारी यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आभार उपसरपंच गणेश पापळ यांनी मानले. राधाकिसन पोखरकर, शिवाजी आवारी, बाळासाहेब भिमाजी आवारी, बाळासाहेब आवारी, राहुल जाधव यांनी चंदन शेतीचे अनुभव कथन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी पर्यवेक्षक एस. जे. वार्डे, कृषी सहायक एस. के. भोये, एन. बी. रामोळे, एल. जे. घागरे, बी. एन. दातीर, ए. बी. वर्पे, ए. ए. गोंदके, टी. एम. कर्पे उपस्थित होते.

( डेरे)

Web Title: Sandalwood cultivation will be useful in changing climates