अक्षय केदार यांना समाजरत्न पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:20 IST2021-02-12T04:20:23+5:302021-02-12T04:20:23+5:30

बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील थाटे येथील पत्रकार अक्षय केदार यांना नुकताच समाजरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. जय भगवान युवा ...

Samaj Ratna Award to Akshay Kedar | अक्षय केदार यांना समाजरत्न पुरस्कार

अक्षय केदार यांना समाजरत्न पुरस्कार

बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील थाटे येथील पत्रकार अक्षय केदार यांना नुकताच समाजरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. जय भगवान युवा प्रतिष्ठान दैत्यनांदूर (ता.पाथर्डी) यांच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो.

थाटे येथील युवा पत्रकार तसेच ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अक्षय केदार (वय २१) यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नांवर लेखणीद्वारे प्रकाश टाकण्याचे काम केले. तसेच वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून वृक्षारोपण करणे, अनाथ, गोर-गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आदींसह इतर उपक्रमांतून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य करत असतात. या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आल्याचे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आजिनाथ दहिफळे यांनी सांगितले आहे. १५ फेब्रुवारी रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

फोटो ११ अक्षय केदार

Web Title: Samaj Ratna Award to Akshay Kedar