बाराबाभळी येथे साळुंकीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:17 IST2021-01-15T04:17:41+5:302021-01-15T04:17:41+5:30

सोमवारी मिडसांगवी येथे ५२ कोंबड्या मृतावस्थेत आढळल्यानंतर प्रशासनाने तातडीने या भागातील १० किलोमीटर त्रिज्येतील परिसर अलर्ट झोन घोषित केला. ...

Salunki dies at Barababhali | बाराबाभळी येथे साळुंकीचा मृत्यू

बाराबाभळी येथे साळुंकीचा मृत्यू

सोमवारी मिडसांगवी येथे ५२ कोंबड्या मृतावस्थेत आढळल्यानंतर प्रशासनाने तातडीने या भागातील १० किलोमीटर त्रिज्येतील परिसर अलर्ट झोन घोषित केला. तसेच मिडसांगवीच्या एक किलोमीटर परिघातील कोंबड्यांची पाहणी करून विक्री व वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

दरम्यान, मिडसांगवीच्या मृत कोंबड्यांच्या नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रयोगशाळेतून आलेला नाही. गुरुवारी किंवा शुक्रवारी तो मिळण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. सुनील तुंभारे यांनी दिली.

------------

कावळे, कबुतरानंतर आता साळुंकी

सोमवारी श्रीगोंद्यात एक कबूतर, एक कावळा तर मंगळवारी मोहा (ता. जामखेड) येथे तीन कावळे मृतावस्थेत आढळल्यानंतर बुधवारी बाराबाभळी (ता. नगर) येथे एक साळुंकीचा मृत्यू झाला. पशुसंवर्धन विभागाने या सर्व पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. मात्र, त्याचाही अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.

-----------

प्रशासन काळजीत

पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांची वाढ होत असताना काही प्रमाणात कोंबड्यांची मरतूक नेहमीची असते. परंतु, ही मरतूक ४० टक्क्यांच्या पुढे गेली तर प्रशासन अलर्ट होते. सध्या जिल्ह्यात कोंबड्यांबरोबरच वन्यपक्षीही मृत आढळल्याने प्रशासनाची काळजी वाढली आहे. त्यातच शेजारील बीड जिल्ह्यात बर्ड फ्लूची साथ आल्याने वन्यपक्ष्यांकडून ती नगर जिल्ह्यात येण्याचा धोका कायम असल्याने अधिकची सतर्कता घेतली जात आहे.

Web Title: Salunki dies at Barababhali