शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

साई निर्वाण नोंदीचे दस्तऐवज सापडेना

By admin | Updated: October 22, 2015 21:16 IST

साईबाबा आणि त्यांचे जीवन चरित्र अवघ्या जगाला सुपरिचित असले तरी शतकापूर्वी झालेल्या त्यांच्या महानिर्वाणाच्या नोंदीचा कोणताही कागद सरकार दप्तरी आढळत नाही

 शिर्डी - साईबाबा आणि त्यांचे जीवन चरित्र अवघ्या जगाला सुपरिचित असले तरी शतकापूर्वी झालेल्या त्यांच्या महानिर्वाणाच्या नोंदीचा कोणताही कागद सरकार दप्तरी आढळत नाही. जीर्ण झालेले सरकारी दप्तर, त्यातील गहाळ झालेली पाने व कमालीच्या अनास्थेने हा दुर्मीळ व ऐतिहासिक ठेवा सध्या तरी अंधारातच आहे.१५ ऑक्टोबर १९१८ रोजी दुपारी अडीचच्या सुमारास बाबा पंचत्वात विलीन झाले. त्यानंतर हिंदू-मुस्लिमांच्या वादात तब्बल छत्तीस तासांनी सध्याच्या बुटीवाड्यात त्यांचा देह समाधिस्त करण्यात आला. यावेळी कोपरगावचे तहसीलदार व राहात्याचे फौजदार उपस्थित होते.. ब्रिटिश राजवटीतही प्रत्येक व्यक्तीच्या जन्म-मृत्युची नोंद घेतली जात असे. मृत्युच्या नोंदीत मृत्युचे कारणही नोंदवले जात. साईबाबा संस्थानची मुहूर्तमेढ रोवणार्‍या व साईभक्त असलेल्या राधाकृष्णा आई यांचा साईबाबांच्या निर्वाणापूर्वी २२ नोव्हेंबर १९१६ रोजी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युची नोंद राहाता तहसील कार्यालयाच्या रेकॉर्ड रूमला आहे. मात्र १९१८ सालच्या अत्यंत जीर्ण झालेल्या दप्तराची केवळ तीन निरूपयोगी पाने शिल्लक आहेत. अनेक कागदपत्रांचा अक्षरश: चुरा झाला आहे.शिर्डीचे प्रांताधिकारी कुंदन सोनवणे यांनी कोपरगाव तर राहात्याचे नायब तहसीलदार राहुल कोताडे यांनी राहाता तहसीलमध्ये या नोंदी शोधण्याकरिता 'लोकमत'ला केलेली मदत निष्फळ ठरली. बाबांच्या देहाचा पंचनामाही उपलब्ध नाही.६ नोव्हेंबर १९६0 रोजी अफरातफरीच्या प्रकरणातून संस्थान व्यवस्थापन बरखास्त करण्यात आले. तेव्हा कागदपत्रे नष्ट करण्याच्या प्रयत्नात अनेक महत्वाचे दस्तऐवजही नष्ट झाल्याचे बोलले जाते. साईबाबांच्या काळात शिर्डी कोपरगाव तालुक्यात होते.१९९७ मध्ये कोपरगावच्या विभाजनानंतर ते राहाता तालुक्यात आले. त्यानंतर बेवारस पडलेले शिर्डीचे दप्तर २0१२ मध्ये राहात्याला आणले गेले. जातीचे दाखल्यांकरता वारंवार झालेल्या हाताळणीने त्याचीही अवस्था बिकट झाली.