दगडांचा आवाज, कॉप्यांचा पाऊस

By Admin | Updated: March 1, 2016 23:33 IST2016-03-01T23:29:18+5:302016-03-01T23:33:45+5:30

अहमदनगर : राज्य परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. मंगळवारी दहावीच्या परीक्षेस सुरुवात झाली

Rock sound, copper rain | दगडांचा आवाज, कॉप्यांचा पाऊस

दगडांचा आवाज, कॉप्यांचा पाऊस

अहमदनगर : राज्य परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. मंगळवारी दहावीच्या परीक्षेस सुरुवात झाली असून यापूर्वीच बारावीची परीक्षा सुरू झालेली आहे. या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असताना त्यात खंड झालेला नाही. मंगळवारी दहावीच्या पेपर दरम्यान नगर तालुक्यातील एका केंद्रावर कॉपीचा प्रकार घडला. विशेष म्हणजे तपासणी पथक आले असल्याचा इशारा मिळताच विद्यार्थ्यांनी खिडकीतून कॉप्या बाहेर टाकल्या.
१६ फे बु्रवारीपासून बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या होत्या. मराठी वगळता अन्य पेपरला कमी- अधिक कॉपीच्या घटना समोर आल्या होत्या. अशी परिस्थिती दहावीच्या बाबतीत घडू नये, यासाठी दक्षता घेण्याची गरज असताना कॉपीचे प्रकार सर्रास सुरू असल्याचे येथील घटनेवरून सिद्ध झाले आहे. या ठिकाणी पहिल्या मराठीच्या पेपरला मोठ्या प्रमाणात कॉपी सुरू होती.
परीक्षा केंद्रावर माध्यमिक शिक्षणाधिकारी सुनंदा ठुबे यांच्या पथकाने भेट दिली. परीक्षा केंद्र तपासणीसाठी पथक येत असल्याचे पाहून परीक्षा केंद्राबाहेर असणाऱ्या मुलांनी पत्र्यावर दगड मारू न कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इशारा दिला. पत्र्यावरील दगडाच्या आवाजामुळे विद्यार्थी गोंधळले. ठुबे परीक्षा केंद्राच्या आत येण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी खिडकीतून कॉप्या बाहेर फे कल्या. पथकाला या ठिकाणी कॉपी करणारे विद्यार्थी आढळले नाहीत. पथक गेल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांनी टाकलेल्या कॉप्या जमा केल्या.
यासंदर्भात शिक्षणाधिकारी ठुबे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांच्या जाण्यापूर्वी किंवा त्या गेल्यानंतर काही घडले असेल, त्यांना याबाबत काही कल्पना नाही. परीक्षा नियंत्रण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची झडती घेवून त्यांना परीक्षा केंद्रात सोडले होते. यामुळे आता विद्यार्थ्यांकडे कॉप्या आल्या कोठून, असा प्रश्न आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Rock sound, copper rain