शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

महसूलच्या कारवाईचा मनपाच्या कामांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:24 IST

अहमदनगर : महापालिकेच्या कामांसाठी लागणाऱ्या दगड, खडी आणि मुरमाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर महसूल विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. महसूलच्या ...

अहमदनगर : महापालिकेच्या कामांसाठी लागणाऱ्या दगड, खडी आणि मुरमाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर महसूल विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. महसूलच्या या कारवाईचा फटका शहरातील रस्त्यांच्या कामांना बसत आहे. परिणामी अर्धवट अवस्थेत असलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागत आहे.

महापालिका हद्दीत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. या कामांसाठी दगड, खडी आणि मुरमाची आवश्यकता असते. रस्ते व गटारींची कामे घेतलेले ठेकेदार खडी, मुरूम, दगड वाहतूकदारांकडून विकत घेतात. त्याबदल्यात महापालिका कामाच्या अंदाजपत्रकात नमूद असलेल्या खडी, दगड आणि मुरमावर महसूल विभागाला रॉयल्टी भरते. दरवर्षी रॉयल्टीचा धनादेश महापालिका महसूलला जमा करत असते. असे असले तरी मनपाच्या ठेकेदारांनी मागविलेल्या दगड, खडी, मुरमाच्या वाहनांवर महसूल विभागाकडून कारवाई केली जाते. कामाचा कार्यारंभ आदेश दाखविला तरी वाहन सोडले जात नाहीत. वाहन मालकावर दंडात्मक कारवाई केली जाते. ही कारवाई लाखांच्या घरात असते. त्यामुळे वाहतूकदार चढ्या भावाने गौण खनिज विक्री करत असून, ते दर ठेकेदारांना परवडत नाहीत. वाढीव दराने खरेदी करण्यापेक्षा ठेकेदार कामे बंद ठेवून तसे पत्र महापालिकेला देत आहेत. त्यामुळे नाईलाजाने महापालिकेला कामे थांबवावे लागत असून, ऐन पावसाळ्यात ही कामे थांबल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

...........

दोन ब्रासचा नियम ठरतोय डोकेदुखी

खाणीतून दगड, मुरूम आणि खडी वाहतूक करताना सिंगल एक्सल वाहनांसाठी २ ब्रास, तर मल्टीएक्सल वाहनांसाठी ४ ब्रास असा नियम आहे. परंतु, डिझेलचे दर वाढल्यामुळे २ ब्रासची वाहतूक करणे वाहतूकदारांना परवडत नाही. त्यामुळे ते जास्तीची वाहतूक करत असून, अशा वाहनांवर महसूलकडून कारवाई केली जात आहे.

.....

शासकीय कामांसाठी लागणाऱ्या गौण खनिजाची वाहतूक नियमानुसार केल्यास कारवाई केली जात नाही. जे वाहतूकदार नियमानुसार वाहतूक करणार नाही, अशा वाहनांवर कारवाई केली जात असून, ठेकेदारांनी नियमानुसार वाहतूक करावी.

- उमेश पाटील, तहसीलदार, नगर तालुका

....

महापालिका एकरकमी रॉयल्टी महसूल विभागाला भरते. असे असून रस्त्यासाठी गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर महसूलकडून कारवाई केली जात आहे. त्यामुळे दगड, खडी आणि मुरमाअभावी शहरातील रस्त्यांची कामे थांबली आहेत.

- सुरेश इथापे, शहर अभियंता, महापालिका

....

शहरातील रस्त्यांची कामे घेतलेले ठेकेदार खडी, मुरूम आणि दगड वाहतूकदारांकडून विकत घेतात. त्यांची वाहने महसूलचे कर्मचारी पकडतात. त्यामुळे वाहतूकदारांकडून साहित्याचा पुरवठा होत नाही. परिणामी चढ्या भावाने साहित्य खरेदी करावे लागत असून, कार्यारंभ आदेश दाखविल्यानंतर वाहने सोडून द्यावीत. जेणेकरून रस्त्यांची कामे थांबणार नाहीत.

- आनंद पुंड, अध्यक्ष, महापालिका ठेकेदार संघटना