बडोदा बँकेचे एटीएम मशीन त्वरित बदलून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:23 IST2021-08-26T04:23:52+5:302021-08-26T04:23:52+5:30
भेंडा : भेंडा (ता.नेवासा) येथील बँक ऑफ बडोदाचे एटीएम मशीन सहा महिन्यांपासून बंदच आहे. त्यामुळे बँक ग्राहकांच्या अडचणी वाढल्या ...

बडोदा बँकेचे एटीएम मशीन त्वरित बदलून द्या
भेंडा : भेंडा (ता.नेवासा) येथील बँक ऑफ बडोदाचे एटीएम मशीन सहा महिन्यांपासून बंदच आहे. त्यामुळे बँक ग्राहकांच्या अडचणी वाढल्या आहेत. यामुळे एटीएम मशीन त्वरित बदलून द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व बँकेच्या ग्राहकांनी केली आहे.
भेंडा येथून पंचक्रोशीतील १५ गावांचा व्यवहार चालतो. साखर कारखाना, जिजामाता विद्यालय, महाविद्यालय व इतर संस्था यामुळे विद्यार्थी, कर्मचारी, ऊस तोडणी कामगार, व्यापारी यांची नेहमीच बँकेत वर्दळ असते. ग्राहकांना पैसे भरणा करणे, पैसे काढणे, तसेच बँकेचे कर्ज प्रकरण या कामासाठी बँकेत नेहमीच गर्दी असते. कोविड काळात शारीरिक अंतर राखण्याचे नियम पाळणे शक्य होत नाही.
यामुळे बँकेचे एटीएम मशीन त्वरित बदलून नवीन एटीएम मशीन देण्याची मागणी रमेश दुकळे, रमेश मोटे, समीर देशमुख, अशोक राजेभोसले, देवीदास पवार, दीपक नवले व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नेवासा तालुकाध्यक्ष सागर महापूर, उपाध्यक्ष शुभम गव्हाणे, कार्याध्यक्ष अभिराज आरगडे, सरचिटणीस सौरभ वायकर आदींनी केली आहे.
------
वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून एटीएम लवकरात लवकर सुरू करण्याचे प्रयत्न आहेत.
-कान्हू पठारे
शाखाधिकारी, बँक ऑफ बडोदा