शहरं
Join us  
Trending Stories
1
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
2
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
3
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
4
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
5
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
6
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
7
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
8
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
9
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
10
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
11
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
12
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
13
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
14
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
15
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
16
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
18
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
19
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
20
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
Daily Top 2Weekly Top 5

पदोन्नतीला नकारघंटा

By admin | Updated: August 3, 2014 01:09 IST

अहमदनगर : अनेक महिन्यांपासून गाजत असलेल्या पद्वीधर शिक्षकांच्या पदोन्नतीच्या प्रक्रियेला शनिवारपासून सुरूवात झाली. पहिल्या दिवशी ३९६ पद्वीधर शिक्षकांना पदोन्नती मिळाली आहे.

अहमदनगर : अनेक महिन्यांपासून गाजत असलेल्या पद्वीधर शिक्षकांच्या पदोन्नतीच्या प्रक्रियेला शनिवारपासून सुरूवात झाली. पहिल्या दिवशी ३९६ पद्वीधर शिक्षकांना पदोन्नती मिळाली आहे. यावेळी पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या १ हजार ४०० पैकी बहुतांशी शिक्षकांनी नकार दिला आहे. पदोन्नतीच्या प्रक्रियेमुळे जिल्हा परिषदेचा परिसर गर्दीने फुलला होता.शनिवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास पदोन्नतीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी प्रक्रियाच्या नियोजनात स्वत:हून लक्ष घालत दहा वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात हजर झाले. प्राथमिक शिक्षक विभागाने तयार केलेल्या पद्वीधर शिक्षकांच्या सेवाज्येष्ठता यादीत आंतरजिल्हा शिक्षकांची नगरऐवजी पूर्वीच्या जिल्ह्याची सेवाज्येष्ठता यादी ग्राह्य धरण्यात आली होती.मात्र, याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त येताच नवाल यांनी आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात आलेल्या शिक्षकांची नगरची सेवा ज्येष्ठतेसाठी धरावी, ज्येष्ठता लपविणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देताच अनेकांनी पदोन्नती नाकारली. त्यानंतर पदोन्नतीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली. पदवीधर शिक्षकांचे पदोन्नतीच्या मराठी माध्यमातून ६३४ आणि उर्दू माध्यमातून ६३ जागा होत्या. पहिल्याच दिवशी यापैकी ३९६ भरल्या गेल्या आहेत. पहिल्या दिवशी शिक्षण विभागाने दोन सत्रात ७०० शिक्षकांचे लॉट जिल्हा परिषदेच्या सभागृहात बोलविले होते. त्यांना सेवाज्येष्ठतेनुसार रिक्त असणाऱ्या जागांचा तपशील दाखविण्यात आला. त्यावर शिक्षकांनी त्यांच्या पसंतीनुसार रिक्त जागांवर पदोन्नती देण्यात आली.वास्तवात मिळणारी पदोन्नती यात २५० रुपये प्रती महिना आर्थिक तोटा असल्याने, तसेच गैरसोईचे ठिकाण यामुळे एक हजारहून अधिक पद्वीधरांनी पदोन्नती नाकारली. जिल्हा परिषदेत दिवसभर शिक्षकांची मोठी गर्दी होती. पदोन्नतीसाठी सभागृहात जाणाऱ्या शिक्षकांसोबत अनेक शिक्षक हौस म्हणून सभागृहात उपस्थित होते. यामुळे विनाकारण गर्दी झालेली दिसत होती. आज रविवारी पदोन्नतीची प्रक्रिया सुरु राहणार असून, उर्वरीत ४०३ जागांवर पदवीधरांना पदोन्नती देण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी गोविंद यांनी सांगितले.(प्रतिनिधी)मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी पदोन्नतीचे योग्य नियोजन केले होते. शिक्षणाधिकारी दिलीप गोविंद, उपशिक्षणाधिकारी गुलाब सय्यद, सुलोचना पटारे, विस्तार अधिकारी रमजान पठाण, एस. बी. कराड, कक्ष अधिकारी शिवाजी भिटे यांच्यासह शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रक्रियेसाठी परिश्रम घेतले. पदोन्नतीची प्रक्रिया व्यवस्थित पारपडते की नाही, याची खातर जमा करण्यासाठी सर्व शिक्षक नेते सभागृहात दिवसभर ठाणमांडून होते. यात संजय कळमकर, रावसाहेब रोहकले, राजू शिंदे, अनिल आंधळे, संजय धमाणे, नवनाथ तोडमल, गोकुळ कळमकर, शिवाजी अनाप यांच्यासह अन्य शिक्षकांचा समावेश होता.