प्रहार करणार सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे पुनर्वसन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:23 IST2021-08-26T04:23:14+5:302021-08-26T04:23:14+5:30
प्रहार संघटनेची जिल्हास्तरीय आढावा बैठक नुकतीच अहमदनगर येथे झाली. त्यावेळी परदेशी बोलत होते. बैठकीला ह.भ.प. अजय महाराज बारस्कर, राज्य ...

प्रहार करणार सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे पुनर्वसन
प्रहार संघटनेची जिल्हास्तरीय आढावा बैठक नुकतीच अहमदनगर येथे झाली. त्यावेळी परदेशी बोलत होते. बैठकीला ह.भ.प. अजय महाराज बारस्कर, राज्य प्रवक्ते संतोष पवार, आदी उपस्थित होते. परदेशी म्हणाले की, राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या विचारानुसार सत्ता ही खऱ्या अर्थाने विकासाचे एक मोठे साधन आहे. परंतु, या प्रवाहात सर्वसामान्य, गोरगरीब व शेतकऱ्यांच्या हालअपेष्टा सुरू आहेत. त्यामुळे बच्चू कडू शेतकरी व माजी सैनिकांसाठी लढत आहेत. प्रहार संघटनेचा नाराच ‘जय जवान, जय किसान’ हा असून, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सत्ताधारी व विरोधकांना शह देण्यासाठी प्रहार या ठिकाणी पूर्ण ताकदीने काम करणार आहे. फक्त सत्तेसाठी राजकारण न करता सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याची स्पष्ट भूमिका प्रहार या ठिकाणी घेणार आहे.
यावेळी समाजसेवक उद्धव अमृते, कार्याध्यक्ष अजित धस, उपाध्यक्ष वामनराव बदे, उपाध्यक्ष पप्पू येवले, जिल्हा संघटक तुकाराम शिंगटे, जिल्हा सचिव प्रकाश बेरड, जिल्हा सल्लागार मालोजी शिकारी, शेवगाव-पाथर्डी विधानसभा अध्यक्ष रामजी शिदोरे, नगर तालुकाध्यक्ष भगवान भोगाडे, शेवगाव तालुकाध्यक्ष संदीपराव बामदळे, शेवगाव शेतकरी तालुकाध्यक्ष संजय नाचण, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष सुरेश सुपेकर, पाथर्डी तालुकाध्यक्ष मुकुंद आंधळे, राहुरी तालुकाध्यक्ष संदेश सिनारे, युवक संघटक नितीन पानसरे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष योगेश घागरे, युवक कार्याध्यक्ष अक्षय कांबळे, युवक शहराध्यक्ष अमोल कातोरे, आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
-----------
फोटो- २५प्रहार
प्रहार संघटनेची जिल्हास्तरीय आढावा बैठक नुकतीच अहमदनगर येथे झाली. यावेळी राज्य प्रवक्ते संतोष पवार, जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी, अजित धस, प्रकाश बेरड, आदी उपस्थित होते.