शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राशीनला जगदंबा मातेचा जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 15:39 IST

राशीन (ता.कर्जत) येथील जगदंबा (येमाई) मंदिरात रविवारी (दि.२९) मंत्रोच्चाराच्या जयघोषात विधीवत पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. नवरात्रीच्या पूर्वसंध्येला मुक्त गुलाल व कुंकवाची उधळण व देवीचा जयघोष करीत गावोगावच्या तरूण भाविकांनी वाजत-गाजत मशाली प्रज्ज्वलित करून प्रस्थान ठेवले.

राशीन : राशीन (ता.कर्जत) येथील जगदंबा (येमाई) मंदिरात रविवारी (दि.२९) मंत्रोच्चाराच्या जयघोषात विधीवत पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली.नवरात्रीच्या पूर्वसंध्येला मुक्त गुलाल व कुंकवाची उधळण व देवीचा जयघोष करीत गावोगावच्या तरूण भाविकांनी वाजत-गाजत मशाली प्रज्ज्वलित करून प्रस्थान ठेवले. यामुळे मंदिर परिसर दणाणून गेला होता. रविवारी सकाळी ११ वाजता आखोबा स्वामी शेटे यांचे सातवे वंशज अमोल शेटे व गुरव पुजारी श्रीकांत रेणूकर यांच्या हस्ते देवीच्या महाभिषेकानंतर घटस्थापना झाली. यानंतर घरोघरी नऊ दिवसांच्या धार्मिक उपासना पर्वाला सुरूवात झाली.यावेळी शिवदास शेटे, शरदचंद्र शेटे, महेश शेटे, उमेश शेटे, नितीन शेटे, जितेंद्र शेटे, योगेश शेटे, ज्ञानेश्वर रेणूकर, विक्रम रेणूकर, सुनील रेणूकर, अ‍ॅड. सचिन रेणूकर, गणेश रेणूकर, विकास वाघमारे, शुभम रेणूकर, मनोज मदवे, तुकाराम सागडे, विजय मोढळे, अ‍ॅड. युवराज राजेभोसले आदींसह भाविक उपस्थित होते. पौरोहित्य संदीप सागडे यांनी केले.मांसाहार, केशकर्तनाची दुकाने बंद..राशीन देवीच्या यात्रेला सर्वधर्मीय भाविक एकत्र येतात. नवरात्राच्या काळात संपूर्ण दहा दिवस मांसाहार वर्ज्य असतो. या काळात मांस विक्रेत्यांची दुकानेही बंद असतात. त्याचप्रमाणे नाभिक समाज केशकर्तनाची दुकाने दहा दिवस बंद ठेवतात. राशीनसह परिसरातील भाविकांकडून पलंग, गादी व पादत्राणांचा (चप्पल) वापर बंद असतो. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे येथील मुस्लिम समाजातील अनेक मंडळी देवीचा नऊ दिवसाचा उपवास करतात.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर