शिर्डी- साई मंदिर परिसरात पालखी ठेवण्याच्या आग्रहाने गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 20:28 IST2018-03-23T20:28:41+5:302018-03-23T20:28:51+5:30

एका पालखीने परंपरेचे कारण देत मंदिर परिसरात पालखी ठेवण्याचा हट्ट धरला आहे

ramnavati festival in shirdi | शिर्डी- साई मंदिर परिसरात पालखी ठेवण्याच्या आग्रहाने गोंधळ

शिर्डी- साई मंदिर परिसरात पालखी ठेवण्याच्या आग्रहाने गोंधळ

शिर्डी- शिर्डीत रामनवमी यात्रा सुरू झाली असून जवळपास दोनशे पालख्या शिर्डीत डेरेदाखल होत आहेत. यातील एका पालखीने परंपरेचे कारण देत मंदिर परिसरात पालखी ठेवण्याचा हट्ट धरला आहे.तर संस्थान व पोलीस प्रशासनाने सुरक्षेचे व अन्य भाविकांच्या दर्शनाच्या सुविधेचे कारण देत मंदिर परिसरात पालखी ठेवण्यास नकार दिला आहे, मंदिरा लगतच्या शताब्दी मंडपात पालखी ठेवण्याचा पर्याय प्रशासनाने दिला आहे मात्र पालखी घेऊन येणारे भाविक आपल्या मागणीवर ठाम असून मंदिरा समोरील महामार्गावर त्यांनी दीड तासापासून ठिय्या दिला आहे, काही ग्रामस्थ प्रशासनाच्या तर काही भाविकांच्या बाजूने आहेत, परिसरात तणावाचं वातावरण असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 

Web Title: ramnavati festival in shirdi