शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानासाठी जिल्हा सहकारी बँकेत खाते उघडण्याची सक्ती

By admin | Updated: May 23, 2016 01:13 IST

अहमदनगर : रब्बीचे अनुदान हवे असल्यास जिल्हा सहकारी बँकेत खाते उघडा, अशी सक्तीच महसूलच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत असून, अनुदानासाठी जिल्हा बँकच का, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे़

अहमदनगर : रब्बीचे अनुदान हवे असल्यास जिल्हा सहकारी बँकेत खाते उघडा, अशी सक्तीच महसूलच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत असून, अनुदानासाठी जिल्हा बँकच का, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे़ विशेष करून उत्तर नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रब्बीच्या अनुदानासाठी ही सक्ती केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे़ सततच्या नापिकीमुळे शेतकरी आर्थिक संकटात आहेत़ सरकारकडून मिळणारी मदत तुटपुंजी आहे़ ही मदत मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते़ पावसाळा तोंडावर आल्याने रब्बीच्या सरकारी मदतीवर शेतकऱ्यांची भिस्त आहे़ शेतीच्या मशागतीसाठी हे पैसे उपयोगी पडतील, अशी आशा शेतकरी बाळगून आहेत़ अद्याप रब्बीचे अनुदान जरी आले नसले तरी ते आल्यानंतर तत्काळ शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे, यासाठी लाभार्थींची यादी तयार करण्याचे काम गाव पातळीवर सध्या सुरू आहे़ही यादी तयार करताना जिल्हा बँकेत खाते उघडण्याची सक्ती काही गावांत केली जात असल्याचे समोर आले आहे़ राष्ट्रीयकृत बँकेत खाते असूनही, जिल्हा बँकेत खाते कशासाठी उघडायचे, असा प्रश्न शेतकरी करत आहेत़ शेतकरी व गाव तलाठ्यामध्ये वाद होत आहेत़ हा विषय ग्रामीण भागात चर्चेचा ठरला आहे़लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून त्यानुसार बँकेच्या नावे धनादेश दिला जातो़ शेतकऱ्यांचे वेगवेगळ्या बँकांत खाते उघडलेले असतात़ त्यानुसार ही मदत बँकेत जमा करण्यात येते़ हे काम सोपे व्हावे, यासाठी एकाच बँकेत खाते उघडण्याचे सक्तीचे करण्यात येत असावे, असा एक मतप्रवाह आहे़ परंतु, प्रशासनाच्या सोयीसाठी शेतकऱ्यांना हा भुर्दंड का, असा प्रश्न आहे़ तर प्रशासनाकडून अशी कोणतीही सक्ती करण्यात आलेली नाही़ बँकनिहाय याद्या तयार करून संबंधितांच्या खात्यावर सरकारी मदत जमा करण्याची पध्दत आहे, असे वरिष्ठ कार्यालयाचे म्हणणे आहे़ असे असूनही बँक खाते उघडण्याची सक्ती का ? याचा शोध घेण्याची गरज असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे़(प्रतिनिधी)रब्बीचे अनुदान हवे असल्यास जिल्हा सहकारी बँकेत खाते उघडण्याची सक्ती करण्यात येत आहे़ राष्ट्रीयकृत बँकेत खाते असूनही जिल्हा सहकारी बँकेत खाते उघडा, असे गावातील तलाठी सांगत आहेत़ -शेतकरीरब्बीच्या अनुदानासाठीच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे़ एकाच बँकेतील खाते असतील तर अनुदान वितरीत करणे सोपे जाते़ पण, अशी सक्ती नाही.-नामदेव टिळेकर, तहसीलदार