Pune Crime: संतापजनक!१९ वर्षीय तरुणीवर वारकरी संस्थेत आणून अत्याचार; कीर्तनकार महिलेचाही कटात सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 12:30 IST2025-07-14T12:27:50+5:302025-07-14T12:30:08+5:30
Pune Crime News: अहिल्यानगर जिल्ह्यातील एका १९ वर्षीय मुलीला आळंदीमध्ये नेण्यात आले आणि तिथे वारकरी संस्थेत डांबून ठेवून तिच्यावर अनेकवेळा अत्याचार करण्यात आला.

Pune Crime: संतापजनक!१९ वर्षीय तरुणीवर वारकरी संस्थेत आणून अत्याचार; कीर्तनकार महिलेचाही कटात सहभाग
Ahilyanagar Crime News: मुलगी घरी एकटीच होती. त्यावेळी महिला कीर्तनकार आली आणि मुलीला शेतात जाऊया असं म्हणाली. मुलगी महिला कीर्तनकारासोबत शेतात जात असतानाच तिचे अपहरण करण्यात आले आणि आळंदीत नेण्यात आले. त्यानंतर तिथे एका खासगी वारकरी संस्थेत तिला डांबून ठेवण्यात आले आणि अनेकवेळा तिच्यावर बलात्कार करण्यात आला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शेवगाव तालुक्यातील एका १९ वर्षीय तरुणीला जबरदस्तीने आळंदी येथील खासगी वारकरी शिक्षण संस्थेत डांबून ठेवून लग्नाची मागणी केली. ही घटना जूनमध्ये घडली. ती समोर आल्यानंतर कीर्तनकार महिलेसह पाच जणांविरुद्ध रविवारी शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
तरुणीसोबत काय घडले?
तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे, प्रवीण प्रल्हाद आंधळे, सुनीता अभिमन्यू आंधळे, अभिमन्यू भगवान आंधळे (रा. आळंदी) आणि गाडी चालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत तरुणीने फिर्यादीमध्ये २ ते ३ जूनदरम्यान आळंदी येथे हा प्रकार घडल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी कीर्तनकार महिलेसह पाच जणांवर गुन्हा करण्यात आला आहेत.
२ जून रोजी सायंकाळी तरुणी घरी एकटी असताना आरोपीच्या आईने 'शेतावर जाऊ या" असे सांगत तिला गावाबाहेर नेले. वाटेत चारचाकी गाडी थांबवण्यात आली. त्यामध्ये अण्णासाहेब, प्रवीण आणि अन्य एक जण होते.