श्री ढोकेश्वर पतसंस्थेला ९८ लाखांचा नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:19 IST2021-04-16T04:19:43+5:302021-04-16T04:19:43+5:30

टाकळी ढोकेश्वर : टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथील श्री ढोकेश्वर पतसंस्थेला २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात ९८ लाख रूपये नफा ...

Profit of Rs. 98 lakhs to Shri Dhokeshwar Patsanstha | श्री ढोकेश्वर पतसंस्थेला ९८ लाखांचा नफा

श्री ढोकेश्वर पतसंस्थेला ९८ लाखांचा नफा

टाकळी ढोकेश्वर : टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथील श्री ढोकेश्वर पतसंस्थेला २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात ९८ लाख रूपये नफा झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अशोक कटारिया यांनी दिली.

संस्थेचे भाग भांडवल अतिशय चांगले असून यंदाच्या आर्थिक वर्षात सभासदांना १२ टक्के लाभांश वाटपाचा निर्णय घेतला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष विजय कटारिया यांनी दिली. श्री ढोकेश्वर पतसंस्थेच्या टाकळी ढोकेश्वर (पारनेर), साकूर (ता. संगमनेर), म्हैसगाव (ता. राहुरी) या ठिकाणी स्वमालकीच्या इमारती आहेत. कोरोनाच्या परिस्थितीत ही कर्मचारी वर्गाच्या पगारात वाढ केली आहे. संस्थेच्या वतीने मोबाईल बँकिंग सेवा सुरू आहे. दरवर्षी सभासदांना १२ टक्के लाभांश वाटपाची परंपरा कायम ठेवली आहे. गुढीपाडव्याच्या

मुहूर्तावर संस्थेने ठेवींवरील व्याजदरात अर्धा टक्के वाढ केली आहे. घर, वाहन, व्यवसाय कर्ज त्वरित देण्यासाठी संस्था तत्पर असल्याचेही कटारिया यांनी सांगितले आहे.

(वा. प्र.)

Web Title: Profit of Rs. 98 lakhs to Shri Dhokeshwar Patsanstha