ग्रामसेवकांचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:23 IST2021-09-21T04:23:13+5:302021-09-21T04:23:13+5:30

मुंबई येथे राज्य ग्रामसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत मुश्रीफ यांची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. ग्रामसेवक संवर्गाची अनेक वर्षांपासून प्रलंबित ...

Priority will be given to the pending issues of Gram Sevaks | ग्रामसेवकांचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडविणार

ग्रामसेवकांचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडविणार

मुंबई येथे राज्य ग्रामसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत मुश्रीफ यांची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.

ग्रामसेवक संवर्गाची अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारी वेतन त्रुटींची मागणी मार्गी लावण्यासाठी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन पदे रद्द करून ग्रामसेवक निवडीची शैक्षणिक पात्रता पदवी करून ग्रामसेवक एकच पद निर्माण करावे. दुसरी पदोन्नती थेट विस्तार अधिकारी द्यावी ही आग्रही मागणी केली. वीस ग्रामपंचायतीमागे एक विस्तार अधिकारी पद निर्माण करून ५०५ विस्तार अधिकारी पदे निर्माण करावीत. ग्रामसेवक संवर्गावरील अतिरिक्त योजनांचा ताण कमी करण्यासाठी ग्रामस्तरावरील ज्या विभागाशी संबंधित जी समिती असेल त्या विभागाचा कर्मचारी सचिव नेमणे व त्याचे अभिलेखे हाताळणे व इतर विभागाचे काम न सोपविणे आदी मागण्यांवर यावेळी चर्चा झाली.

नवीन आर्थिक भार विरहित मागण्यांबाबत लवकरच निर्णय घेऊ व आर्थिक बोजा पडणाऱ्या मागण्यांबाबत कोरोना लाट आटोक्यात आल्यानंतर अंमलबजावणीसाठी पुन्हा बैठक घेण्याचे आश्वासन मुश्रीफ यांनी दिले.

यावेळी राज्य ग्रामसेवक संघ राज्यध्यक्ष विजय म्हसकर, सरचिटणीस के. आर. किरुळकर, राज्य उपाध्यक्ष सागर सरावणे, राज्य सचिव अनिल जगताप, छत्रपती ग्रामसेवक पतसंस्था अध्यक्ष सुदाम बनसोडे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मेहेत्रे,

नवनाथ गोरे, भाऊसाहेब भांड, संतोष देशमुख, कारभारी जाधव, दत्ता जंगले आदी उपस्थित होते.

----

२० नेवासा ग्रामसेवक

मुंबई येथे ग्रामसेवकांच्या विविध मागण्यांबाबत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्य ग्रामसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

Web Title: Priority will be given to the pending issues of Gram Sevaks