पारगाव भातोडी गावाचा सर्वांगीण विकास आराखडा सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:27 IST2021-08-25T04:27:06+5:302021-08-25T04:27:06+5:30

नगर जिल्ह्यातील ऐतिहासिक महत्व असलेले हे गाव ग्रामविकास राज्यमंत्र्यांनी दत्तक घेतले असून या गावाचा विकास आराखडा तयार करण्यासाठी मंगळवारी ...

Present the overall development plan of Pargaon Bhatodi village | पारगाव भातोडी गावाचा सर्वांगीण विकास आराखडा सादर करा

पारगाव भातोडी गावाचा सर्वांगीण विकास आराखडा सादर करा

नगर जिल्ह्यातील ऐतिहासिक महत्व असलेले हे गाव ग्रामविकास राज्यमंत्र्यांनी दत्तक घेतले असून या गावाचा विकास आराखडा तयार करण्यासाठी मंगळवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिलकुमार ओसवाल, नगर तालुक्याचे गटविकास अधिकारी सचिन घाडगे, तालुक्याचे तहसीलदार उमेश पाटील, महावितरणचे अभियंता कोपनर, विस्तार अधिकारी चंद्रकांत खाडे, ग्रामविकास अधिकारी सचिन पवार, पारगावच्या सरपंच मीनाक्षी शिंदे, व्याख्याते गणेश शिंदे आदी उपस्थित होते.

राज्यमंत्री सत्तार पुढे म्हणाले, पारगाव भातोडी गावचा विकास आराखडा करताना आधी या गावच्या सीमा निश्चितीचे काम मंत्रालय स्तरावरून आदेशित करुन व्हायला पाहिजे. त्याच बरोबर या गावातील तळे सुशोभिकरण, किल्ला, ब्रिटिशकालीन भिंतीचे संवर्धन व्हावे यासाठी ग्रामविकास, पुरातत्व विभाग व पर्यटन विभागाच्या समन्वयाने काम होणे आवश्यक आहे. याठिकाणी असलेले पुरातन शिव मंदिर, वाघेश्वरी देवीचे मंदिर यांचा जीर्णोद्धार तसेच मज्जीद समोरील जागेत मुस्लिम समाजासाठी शादीखाना प्रस्तावित करण्यात आले आहे. गावातील शाळेच्या परिसरात मुलांसाठी खेळण्याची जागा, ग्रामपंचायतीची नवी इमारत, विद्युतीकरण व इतर सुशोभीकरणाचे काम प्रस्तावित आहे.

यावेळी व्याख्याते गणेश शिंदे आणि सरपंच मीनाक्षी शिंदे यांनी गावाच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या विविध मागण्या व गावांची सद्यस्थिती दर्शवणारे सादरीकरण केले.

---------

फोटो - २४ पारगाव बैठक

नगर तालुक्यातील पारगाव भातोडी हे गाव ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दत्तक घेतले असून या गावाचा विकास आराखडा तयार करण्यासाठी मंगळवारी मंत्रालयात बैठक झाली.

Web Title: Present the overall development plan of Pargaon Bhatodi village