वीज रोहित्रांचा पुरवठा खंडित करू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:21 IST2021-07-27T04:21:39+5:302021-07-27T04:21:39+5:30
कोपरगाव : कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील वीजपुरवठा करणाऱ्या वीज रोहित्राचा वीजपुरवठा खंडित करू नये, या मागणीचे माजी आमदार स्नेहलता कोल्हे ...

वीज रोहित्रांचा पुरवठा खंडित करू नये
कोपरगाव : कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील वीजपुरवठा करणाऱ्या वीज रोहित्राचा वीजपुरवठा खंडित करू नये, या मागणीचे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना निवेदन दिले आहे.
कोल्हे म्हणाल्या, कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकरी बांधवांनी पाऊस उशिरा झाल्याने पेरणी उशिरा केल्या आहेत. त्यातच पावसाने दडी मारल्याने शेतकरी बांधव चिंतातुर झालेली आहे. शासनाने ज्या वीज रोहित्रावर कृषिपंपाची वीजबिले थकलेली आहे. त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश काढले आहे. त्यामुळे शेतकरी बांधव संकटात सापडले आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा तसेच उभ्या पिकांना पाणी मिळत नसल्यामुळे वीजपुरवठा खंडित करणार असल्याने शेतकरी चिंतातुर झालेले आहेत. बहुतांश शेतकरी हे शेतीला जोड धंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करत आहे. त्यामुळे जनावरांच्या पाण्यासह हिरव्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे.