शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

मतदान केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त

By admin | Updated: December 23, 2015 23:25 IST

अहमदनगर : विधान परिषदेच्या नगर स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी मतदारसंघातील निवडणूक निर्भय वातावरणात घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयुक्तांनी बुधवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले

अहमदनगर : विधान परिषदेच्या नगर स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी मतदारसंघातील निवडणूक निर्भय वातावरणात घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयुक्तांनी बुधवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत़ गैरवापर केल्यास कडक पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत़राज्य निवडणूक आयुक्त ांच्या वतीने सचिव नितीन गद्रे यांनी दुपारी राज्यातील विधान परिषद निवडणुकीचा व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे आढावा घेतला़ निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कवडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र पाटील, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण आनंदकर यावेळी उपस्थित होते़ विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदारांची संख्या मर्यादित आहे़ मतदार संख्या कमी असल्याने निवडणुकीत गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ त्यामुळे मतदान केंद्रावरील घडामोडीचे व्हिडीओ चित्रीकरण करण्याच्या सूचना यावेळी गद्रे यांनी केल्या आहेत़ शहरासह जिल्ह्यातील १६ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येत आहे़ ही सर्व मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत़ मतदान केंद्राभोवती कडेकोट बंदोबस्तही तैनात करण्यात येणार असून, मतदानाच्या दोन दिवस आधीच मतदान केंद्रांवर साहित्य पोहोच केले जाईल. (प्रतिनिधी)मतदान केंद्रावरील सुरक्षा वाढविण्याची गाडेंची मागणीशहरासह जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर तपासणी घेऊनच मतदारांना प्रवेश देण्यात यावा़ तसेच मतपत्रिका व्यवस्थित पेटीत टाकली किंवा नाही, यावर प्रशासनाने लक्ष ठेवावे़ मतदार प्रतिनिधींना केंद्रात प्रवेश देऊ नये, त्यांची व्यवस्था मतदान केंद्राबाहेर करावी़ याशिवाय ५० टक्के महिला मतदार आहेत़ त्यामुळे केंद्रांवर महिला पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी़ महिलांच्या सुरक्षेची मागणी सेनेचे उमेदवार शशिकांत गाडे यांनी बुधवारी निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कवडे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे़