पहिल्याच दिवशी थाळ्या संपल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:20 IST2021-04-16T04:20:03+5:302021-04-16T04:20:03+5:30

अहमदनगर : राज्य सरकारने लॉकडाऊनच्या १५ दिवसाच्या काळात शिवभोजन केंद्रावर शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा केली. पहिल्याच दिवशी नगर ...

The plates ran out on the first day | पहिल्याच दिवशी थाळ्या संपल्या

पहिल्याच दिवशी थाळ्या संपल्या

अहमदनगर : राज्य सरकारने लॉकडाऊनच्या १५ दिवसाच्या काळात शिवभोजन केंद्रावर शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा केली. पहिल्याच दिवशी नगर शहरातील थाळी केंद्रावर प्रतिसाद मिळाला. उद्दिष्टाइतक्या थाळ्या दुपारच्या आधीच संपल्याने अनेक गरजूंना उपाशीपोटीच माघारी फिरावे लागले.

१४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजल्यापासून संचारबंदी सुरू झाली. या काळात गोरगरीब, गरजूंचे जेवणाअभावी हाल होणार नाहीत, यासाठी मुख्यमंत्र्यांनी शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा केली. हीच थाळी गतवर्षी दहा रुपयाला तर लॉकडाऊनच्या काळात पाच रुपयाला करण्यात आली होती. आता ही थाळी सध्या १५ दिवस मोफत मिळणार आहे. मोफत थाळीचा गुरुवारी पहिलाच दिवस होता. त्यामुळे संचारबंदीतही अनेकांनी शिवभोजन थाळीकडे धाव घेतली. वेळेआधीच थाळ्या संपल्याने केंद्र चालकही हतबल झाले. पार्सल घेण्यासाठी आलेल्यांना रिकाम्या पोटीच परतावे लागले. एका केंद्रावर चांगलीच गर्दी झाली होती. तिथे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

----

अशी आहे थाळी

एकूण केंद्र- २९

प्रतिदिन क्षमता- ३,५०० थाळी

वाढीव प्रस्ताव-८००

------------------

नेट फोटो

शिवभोजन

राईस

राईस

Web Title: The plates ran out on the first day