वडुले येथे वृक्षारोपण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:21 IST2021-07-26T04:21:52+5:302021-07-26T04:21:52+5:30

शेवगाव : तालुक्यातील वडुले गावात वृक्षारोपण मोहीम हाती घेण्यात आली असून रविवारी गावातील विविध भागांत गावकऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात ...

Plantation campaign at Vadule | वडुले येथे वृक्षारोपण मोहीम

वडुले येथे वृक्षारोपण मोहीम

शेवगाव : तालुक्यातील वडुले गावात वृक्षारोपण मोहीम हाती घेण्यात आली असून रविवारी गावातील विविध भागांत गावकऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. काही दिवसांपूर्वी पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी वडुले गावाला भेट दिली होती. या वेळी त्यांनी पावसाळ्यात गावात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करावे, असे आवाहन गावकऱ्यांना केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत वडुले ग्रामपंचायतने वृक्षारोपण मोहीम हाती घेतली असल्याचे सरपंच प्रदीप काळे यांनी सांगितले. रविवारी सकाळी गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्ष लावून वृक्षारोपण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. गावात लिंब, वड, पिंपळ, सिसम, जांभूळ, आपटा, आंबा, करंज आदी प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. या वेळी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते.

Web Title: Plantation campaign at Vadule