शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅपवर पीएफची माहिती

By admin | Updated: June 5, 2014 00:06 IST

अहमदनगर : विविध उद्योगातील कर्मचार्‍यांना फेसबुक आणि व्हॉटस्अ‍ॅपद्वारे भविष्यनिर्वाह निधीतील (पीएफ) नवीन बदलांबाबत माहिती देण्यात येणार आहे़

अहमदनगर : विविध उद्योगातील कर्मचार्‍यांना फेसबुक आणि व्हॉटस्अ‍ॅपद्वारे भविष्यनिर्वाह निधीतील (पीएफ) नवीन बदलांबाबत माहिती देण्यात येणार आहे़ कर्मचार्‍यांच्या तक्रारीही व्हॉटस्अ‍ॅप व एसएमएसद्वारे स्वीकारण्यात येणार आहे़ त्यासाठी भविष्यनिर्वाह निधी नाशिक क्षेत्रीय कार्यालयाने ९४२३००८५९६ हा क्रमांक जाहीर केला आहे़ असा प्रयोग राबविणारे नाशिक हे राज्यातील पहिले क्षेत्रीय कार्यालय ठरले आहे़ भविष्यनिर्वाह निधीतील नवीन बदलाबाबत विविध उद्योगात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना माहिती व्हावी, यासाठी नाशिक कार्यालयाने फेसबुकवर ‘ईपीएफओएसआरओनासिक’ या नावाने पेज तयार केले आहे़ या पेजला कर्मचार्‍यांनी लाईक केल्यास पीएफबाबत नवीन माहिती कर्मचार्‍यांना या पेजवरुन पुरविण्यात येणार आहे़ कर्मचार्‍यांना पीएफ संदर्भात काही तक्रारी असल्यास पूर्वी कार्यालयात जावून तक्रार अर्ज भरुन द्यावा लागत होता़ मात्र, आता कर्मचार्‍यांना तात्काळ तक्रार करता यावी, यासाठी व्हॉटसअ‍ॅप व एसएमएस सेवा नाशिक कार्यालयाने सुरु केली आहे़ कर्मचार्‍यांना व्हॉटसअ‍ॅप व एसएमएसद्वारे तक्रार नोंदविण्यासाठी ९४२३००८५९६ हा क्रमांक क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त जगदिश तांबे यांनी जाहीर केला आहे़ या क्रमांकावर कोणालाही दूरध्वनी करुन संपर्क करता येणार नाही़ मात्र, व्हॉटसअ‍ॅप किंवा एसएमएस केल्यास तक्रारदारांना काही वेळातच तक्रारीबाबत प्रतिसाद मिळेल, असे या कार्यालयाकडून सांगण्यात आले़ या सेवेचा शुभारंभ प्रवरानगर (ता़राहाता,जि़अहमदनगर) येथील डॉ़ धनंजयराव गाडगीळ सभागृहात आयोजित कार्यशाळेत तांबे यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला़ यावेळी सहाय्यक भविष्य निधी आयुक्त सुबोध सुलाखे, प्रवर्तन अधिकारी सुरेंद्र कुलकर्णी, ए़ ए़ शेख, विखे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब निबे, डी़ यु़ खर्डे आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)नाशिक कार्यालयाने फेसबुकवर ‘ईपीएफओएसआरओनासिक’ या नावाने पेज तयार केले आहे़ पेजला कर्मचार्‍यांनी लाईक केल्यास पीएफबाबत नवीन माहिती कर्मचार्‍यांना या पेजवरुन पुरविण्यात येणार आहे़