शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल पंपांवर दरोडा घालणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:26 IST

अहमदनगर : पेट्रोलपंपांवर दरोडे टाकून लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली असून, त्यांच्याकडून १ लाख ८० हजार रुपये ...

अहमदनगर : पेट्रोलपंपांवर दरोडे टाकून लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली असून, त्यांच्याकडून १ लाख ८० हजार रुपये किमतीच्या तीन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. आरोपींवर यापूर्वीही खुनासह इतर अनेक गुन्हे दाखल आहेत.

नगर-सोलापूर रस्त्यावर असलेल्या साकत (ता. नगर) शिवारातील केतन पेट्रोलपंपावर १ ॲागस्ट रोजी सात ते आठ दरोडेखोरांनी दरोडा टाकून पेट्रोल पंपावरील कर्मचारी, तसेच तेथे उभे असलेल्या ट्रक चालक यांना मारहाण करून पिस्टला धाक दाखवत मोबाईल, रोख रक्कम असा २ लाख ५५ हजार ८०० किमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याशिवाय ११ ॲागस्टला नगर-सोलापूर रोडवर थेरगाव फाटा (ता. कर्जत) येथील फाळके पाटील ॲण्ड सन्स या भारत पेट्रोलपंपावर अज्ञात चोर आरोपींनी दरोडा टाकून तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण केली व ९९ हजार ५०० रुपये रोख रक्कम व चार मोबाईल असा एकूण १ लाख २३ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अकरा दिवसांत दोन पेट्रोलपंप लुटल्याने पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेेने या प्रकरणी तपास सुरू केला. निरीक्षक अनिल कटके व त्यांच्या पथकाने कसून तपास करीत या गुन्ह्यांतील काहींची नावे निष्पन्न केली. परंतु, आरोपी वारंवार राहण्याचे ठिकाण बदलून पसार होत होते. त्याचवेळी पथकाला माहिती मिळाली की, हे आरोपी त्यांच्या गावी हातोळण (ता. आष्टी) येथे आले आहेत. त्यानुसार पथकाने हातोळण येथे सापळा लावून आरोपी कृष्णा विलास भोसले (वय २२), रावसाहेब विलास भोसले (४०) व अजिनाथ विलास भोसले (२५, तिघे, रा. हातोळण, ता. आष्टी), सुरेश पुंजाराम काळे (३८, सोनवीर, ता. शेवगाव) यांना शिताफीने ताब्यात घेतले. प्रथम आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र कसून चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा इतर तीन साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. त्यानुसार इतरांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून १ लाख ८० हजार रुपये किमतीच्या विना क्रमांकाच्या तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

-------------

आरोपींवर पूर्वीचे गुन्हे दाखल

यातील आरोपींवर यापूर्वी खून, मोक्का, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, मारामारी असे अनेक गुन्हे आष्टी, पुणे, श्रीगोंदा, जामखेड, नगर तालुका, एमआयडीसी, आदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

-------------

फोटो- १६एलसीबी

पेट्रोलपंपांवर दरोडे टाकून लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली.