लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदानाचा टक्का वाढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:21 IST2021-07-26T04:21:21+5:302021-07-26T04:21:21+5:30

जिल्हा प्रशासन, जिल्हा निवडणूक विभाग, नेहरू युवा केंद्र व उमंग फाउंडेशनच्या वतीने पिंपळगाव उज्जैनी (ता. नगर) येथे शनिवारी मतदार ...

The percentage of voting should be increased to strengthen democracy | लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदानाचा टक्का वाढावा

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदानाचा टक्का वाढावा

जिल्हा प्रशासन, जिल्हा निवडणूक विभाग, नेहरू युवा केंद्र व उमंग फाउंडेशनच्या वतीने पिंपळगाव उज्जैनी (ता. नगर) येथे शनिवारी मतदार जागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी डॉ. गिऱ्हे बोलत होते. यावेळी अ‍ॅड. भानुदास होले, अ‍ॅड. महेश शिंदे, वैशाली कुलकर्णी, मतदार दूत अमोल बागुल, अ‍ॅड. अनिता दिघे, सरपंच चंद्रकला वाघ, सोसायटीचे अध्यक्ष गोरख वाघ, उपसरपंच राजश्री अल्हाट आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात ग्रामस्थांकडून मतदार जागृतीसाठी संकल्पपत्र भरून घेण्यात आले. अ‍ॅड. महेश शिंदे यांनी मतदानाचे महत्त्व विशद करून गावातील युवक-युवतींना मतदार नोंदणी करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी माउली पाटोळे, गंगाधर वाघ, श्रेयश अल्हाट, लहू अल्हाट, भाऊसाहेब मोरे, बाबूराव पाटोळे, संदीप अल्हाट, कानिफनाथ वाघ, राहुल अल्हाट, नवीन निकाळजे, दाऊद शेख, आदेश वाघ, जगन्नाथ मगर, भगवान आढाव, ईस्माइल शेख, संतोष अल्हाट आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमास नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: The percentage of voting should be increased to strengthen democracy