शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

योजनांच्या यशस्वीतेसाठी लोकसहभाग हवा

By admin | Updated: June 2, 2014 00:38 IST

अहमदनगर : सरकारची कोणतीही योजना लोकहितासाठीच असते. ती प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी कामाचा भाग म्हणून तिची अंमलबजावणी करीत असतात.

अहमदनगर : सरकारची कोणतीही योजना लोकहितासाठीच असते. ती प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी कामाचा भाग म्हणून तिची अंमलबजावणी करीत असतात. मात्र, तिचे यशापयश हे लोकसहभागावर अवलंबून असते. लोकसहभागाशिवाय कोणतेही काम अशक्य आहे. त्यामुळे लोकांनी प्रत्येकवेळी पुढे यायला हवे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कवडे यांनी शनिवारी सायंकाळी ‘लोकमत’ला सदिच्छा भेट दिली. या भेटीत त्यांनी शासनाच्या योजना, अधिकारी, कर्मचार्‍यांची मानसिकता आणि राजकीय पुढार्‍यांचे सामाजिक योगदान आणि अगदी अवैध वाळूउपसापासून पाणलोटविकासापर्यंत विविध विषयांवर संपादकीय विभागाशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी त्यांच्यासोबत कर्जतचे उपविभागीय अधिकारी मिश्रा हेही उपस्थित होते. आवृत्ती प्रमुख अनंत पाटील, सरव्यवस्थापक शिरीष बंगाळे यांनी त्यांचे स्वागत केले. पाणलोटासाठी सरकारी अनेक योजना आहेत. परंतु लोकांनी पुढाकार घेतल्यास त्याला मूर्त स्वरूप येऊ शकते. योजनेत ग्रामस्थांचा सहभाग असला तर त्यात आपलेपणाची भावना निर्माण होते. ही भावना असेल तर योजना दीर्घ काळ टिकते. पूर्वी गावात रात्रीच्या वेळी गावकरीच गस्त घालून आपले संरक्षण करीत. पोलीस यंत्रणा असो नाही तर महसूल त्यांना मर्यादा आहेत. प्रत्येक काम सरकारने करावे अशी लोकांची भावना आहे. पण आपलेही उत्तरदायीत्त्व लोकांनी विरसता कामा नये. पूर्वी गावात रामायण, महाभारत, नवनाथाचे ग्रंथ वाचले जायचे. विविध माध्यमांतून लोकांना मार्गदर्शन होई. मात्र, आता टी.व्ही.मुळे मार्गदर्शनाचा प्रश्नच राहिला नाही. याचाही परिणाम होतो आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले. (प्रतिनिधी) वाळूतस्करांवर कारवाई वाळू उपसा रोखण्यासाठी त्रिस्तरीय पथके नेमली आहे. मुख्य रस्त्यांवर चेक नाके आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. तरीही वाळू चोरी होते. ही वस्तुस्थिती आहे. ही रोखण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन प्रशासनाला मदत केली पाहिजे. तसे झाल्याशिवाय तस्करी रोखता येणार नाही. कारण प्रशासनालाही मर्यादा आहेत, असे ते म्हणाले. अनुकरण का होत नाही राळेगणसिद्धी व हिवरे बाजार ही गावे जगाच्या नकाशावर आली आहे, ते केवळ लोकसहभागामुळेच. मात्र, हा लोकसहभाग वाढविण्यासाठी तेथील अण्णा हजारे व पोपटराव पवारांसारखे नेतृत्व पुढे आले. विकासात स्वयंप्रेरणा फार महत्त्वाची आहे. परंतु या गावांचीच उदाहरणे किती दिवस आपण देत राहणार. त्यांचा आदर्श घेऊन इतर गावे का अनुकरण करीत नाहीत. याचाही शोध घेतला पाहिजे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.